(श्री. सतिष एस राठोड)
- केंद्रीय दादा इदाते अायोगाच्या शिफारसी म्हणजे विमुक्त घुमंतू जनजातींच्या उत्थानाची पहाट.
- अायोगाच्या अंमलबजावणीसाठी विमुक्त घुमंतू जनजातींच्या सर्व देश व राज्य पातळीवरील संस्था व संघटना यांनी सरकारकडे पाठपुरावा करावा- श्री.अनिल फड
नागपूर :- काल रविवार दि.९ डिसेंबर रोजी अजंठा सभागृह,वैद्यनाथ चौक,मेडिकल रोड,नागपूर येथे अखिल भारतीय विमुक्त घुमंतू जनजाती वेलफेअर संघ नई दिल्ली, महाराष्ट्र राज्य नागपूर जिल्हा शाखा आयोजित युवक युवती स्वयंरोजगार मार्गदर्शन,अारक्षण संघर्ष जनजागृती मेळावा तथा मा.दादा इदाते अायोगाच्या शिफारसी या कार्यक्रमात विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद राज्य कार्यवाह मा.श्री.अनिल फड यांनी संघटनेची ओळख कार्य, संघटन याविषयी अाणि केंद्रिय इदाते अायोगाच्या शिफारसी याबद्दल उपस्थितांशी हिंदी मध्ये संवाद साधला अाणि अतिशय सखोलपणे इदाते अायोगाच्या शिफारसी विषयी माहीती दिली.
देशभरातील विमुक्त घुमंतू जनजातीमध्ये इदाते अायोगाच्या वतिने सरकारला केलेल्या शिफारसी बद्दल जनजागृती करणे हे अापले अाद्य कर्तव्य असुन देश व राज्य पातळीवरील सर्व संस्था संघटना यांनी सर्व मतधेद बाजूला ठेऊन या अतिशय उपेक्षित व वंचित प्रवर्गाला सामाजिक, शैक्षणिक प्रवाहात अाणण्यासाठी एक झाले पाहिजे अाणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु केला पाहिजे.
या अायोगाच्या शिफारसी म्हणजे विमुक्त घुमंतू जनजातीच्या उत्थानाची पहाट होणार अाहे. यासाठी सर्वांचे सहकार्य, संघटित शक्ती अाणि संघर्ष याची गरज अाहे. असेही विचार श्री.अनिलजी फड यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी अ.भा.वि.घु.वेलफेअर संघ अध्यक्ष मा.श्री.रविंद्रकुमार सिंह,महिला अध्यक्षा मा.रानुकुमारीजी छारी,अायोजक मा.श्री.अानंदराव अंगलवार,भटके विमुक्त संघर्ष वाहिनीचे संयोजक मा.श्री.दिनानाथजी वाघमारे,चंद्रशेखर कोटेवार,मा.सौ.प्रभाताई चिलके,राज्य उपाध्यक्ष तथा भाजपा भ.वि.अाघाडीचे प्रदेश अध्यक्ष मा.श्री.योगेशजी बन,वि.घु.जनजाती विकास परिषदेचे राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख श्री.मुकुंदजी अडेवार,विदर्भ अध्यक्ष मा.श्री.किशोरजी सायगण,कार्यवाह डाॅ.योगेश दुधपचारे यांच्यासहित पदाधिकारी यांची उपस्थिती होती.