एकात्मिक बालविकास प्रकल्प समितीच्या तालुकाध्यक्षपदी अश्विनी नाईक

मरखेल – देगलूर तालुका एकात्मिक बालविकास प्रकल्प समितीच्या अध्यक्षपदी तालुक्यातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते ऍड. रामराव नाईक यांच्या सुविद्यपत्नी सौ.  अश्विनीताई रामराव नाईक गवंडगावकर यांची नुकतीच निवड करण्यात आली.
2014-09-21_124352

पालकमंत्री डी.पी. सावंत यांच्या सूचनेवरुन अगोदरच्या अशासकीय सदस्याची निवड रद्द करुन नव्या सदस्यांच्या निवडीच्या आदेशानुसार तहसीलदार जीवराज डापकर यांनी सौ. नाईक यांची निवड झाल्याचे सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबू पाटील खुतमापूरकर, पं.स. सदस्य ऍड. प्रतिम देशमुख, रमेश पाटील हाळीकर, सादिक मरखेलकर, पप्पू रेड्डी अर्धे, हज्जूसेठ चमकुडे, शिवराज पाटील, रोहिदास नाईक, प्रकाश देशमुख, बाबू राठोड, धोंडीबा सोनतोडे, संदीप पाटील सूर, राजू शेटकर, किशनराव पाटील, मधूकर सावकार लाखे, नंदू धुमाळे, निझामोद्दिन माळेगावकर, किशन रावसाहेब, रमेश नेवळे आदींनी अभिनंदन केले आहे.