कल्याण पं.स.तर्फे दि.११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त “लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा” उद्घाटन कार्यक्रम संपन्न

दिप प्रज्वलन करतांना उपस्थित मान्यवर

कल्याण (प्रतिनिधी) :- पंचायत समिती,कल्याण येथील “आरोग्य विभागातर्फे” दि ११जुलै २०१८ रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त “लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा” राबविण्यात येणार असुन या कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स. उपसभापती श्री. पांडुरंग म्हात्रे हे होते. तर प्रमुख अतिथी, सभापती सौ.दर्शनाताई जाधव, मा.अशोक चव्हाण (अध्यक्ष-अपंग कर्मचारी संघटना-मुंबई/प्रदेशाध्यक्ष-राष्ट्रीय बंजारा टायगर्स), समाजसेवक तथा पत्रकार-सतिष राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तानाजी चव्हाण, डॉ.कापुस्कर, पत्रकार-संजय कांबळे, उमेश जाधव, इ.मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य सेवकांना प्रमाणपत्र देतांना मा. अशोक चव्हाण
आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा, नर्स यांना प्रमाणपत्र देतांना उप सभापती मा. पांडुरंग म्हात्रे
आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य सेवक यांना प्रमाणपत्र देतांना पत्रकार सतिष राठोड

या कार्यक्रमामध्ये तालुक्यातील आरोग्य क्षेत्रामधे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ” स्वयंसेविका, आशा, आरोग्यसेवक, नर्स, परिचर, वैद्यकीय अधिकारी यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य सेविका, नर्स यांना प्रमाणपत्र देतांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण
आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ तानाजी चव्हाण

यावेळी डॉ.तानाजी चव्हाण, मा.अशोक चव्हाण, पत्रकार सतिष राठोड, यांनी “लोकसंख्या वाढ” कशी रोखता येईल याबाबत उपस्थित कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांना मार्गदर्शन केले. तसेच पावसाळा सुरु असल्यामुळे तालुक्यातील जनतेला आरोग्याची काळजी घेऊन हिवताप, डेंग्यू, अशा साथिच्या रोगाची लागण होऊ नये यासाठी कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याचे व ” लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा ” या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रमेश राठोड ( वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी) तर सूत्रसंचालन श्री. खिस्मतरावसाहेब यांनी केले. आणि शेवटी आभार डॉ.तानाजी चव्हाण, (तालुका आरोग्य अधिकारी) यांनी मानले.