मुंबई:- अखिल भारतीय बंजारा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चेतन चव्हाण यांचा मुबंई दौरा हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचा असून यादरम्यान सुरुवातीला बिनविरोध म्हणून निवड झालेले विधानसभा विरोधीपक्षनेता मा,विजय वडेट्टीवार तसेच विधानपरिषद उपसभापती पदी सौ नीलम ताई गोऱ्हे याना शुभेच्छा देऊन बंजारा समाजाच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
त्यानंतर ,विरोधीपक्षनेते विधानपरिषद मा,धनंजय मुंडे यांची भेट घेण्यात आली तसेच मा अजितदादा पवार नेते विधिमंडळ आणि काही मंत्री महोदयांसोबत सुद्धा भेट झाली एकंदरीत या भेटी दरम्यान अनेक बंजारा समाजाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली या मध्ये प्रामुख्याने आरक्षण क्रिमिलीयर ची अट आणि तांड्यामध्ये प्राथमिक सुविधा आरोग्य शिक्षण या मध्ये सुधारणा तात्काळ करण्यात यावी अशा अनेक मागण्या मंत्री महोदय आणि इतर नेत्यांसमोर मांडण्यात आल्या आणि त्याना अखिल भारतीय बंजारा सेनेचे निवेदन देण्यात आले त्यावर त्यांनी आश्वासीत केले काही समस्या या तात्काळ सोडवू असे सांगितले या वेळेस बंजारा सेनेचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष राजुभाऊ राठोड आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.