जागतिक आरोग्य संघटनेकडून रोटरी मिलेनियम व तळेगाव आरोग्य केंद्राचे कौतुक

  • डॉ. प्रमोद सोनवणे यांचे कौतुक.
  • लसीकरणाचा 27 नोव्हेंबर रोजी राज्यात शुभारंभ ????

(श्री. सतिष एस राठोड)

चाळीसगांव :- रोटरी मिलेनियम चाळीसगाव व तळेगाव आरोग्य केंद्रातर्फे केंद्र सरकार व राज्य शासनाच्या गोवर रूबेला लसीकरण जनजागृती मोहिमेत आजपर्यंत सुमारे ४० हजार विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केल्याबद्दल रोटरी मिलेनियम अध्यक्ष तथा तळेगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांचे जागतिक आरोग्य संघटनेचे निरीक्षक मा.डाॅ प्रकाश यांनी कौतुक करून गौरवोद्गार काढलेत.

तसेच त्यांनी लोकसहभागातून शासनास मदतगार ठरलेले व बनवलेले गोवर रूबेला लसीकरण जनजागृती स्टिकर हे कल्पकतेचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे प्रतिपादन डाॅ प्रकाश यांनी केले.

सदर स्टिकरचे जिल्हास्तरावर अनावरण करताना जिल्हा आरोग्य अधिकारी मा डॉ बी एस कमलापुरकर मॅडम व जागतिक आरोग्य संघटनेचे डाॅ. प्रकाश यांच्या हस्ते संपन्न झाले. डाॅ प्रमोद सोनवणे यांच्यासह रोटरी मिलेनियमचे व चाळीसगाव नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण सभापती सौ. रंजनाताई यशवंतराव सोनवणे यांचेही स्टिकरच्या निर्मितीसाठी सामाजिक योगदान दिल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी मा डॉ बी एस कमलापुरकर व डाॅ प्रकाश यांनी आभार मानले.

डाॅ प्रमोद सोनवणे यांनी वैद्यकीय सेवेच्या झपाटलेल्या वृत्तीतून केलेली गोवर रूबेला लसीकरण विषयीची जनजागृती संपूर्ण भारतातून एक आदर्श उदाहरण असून WHO सह केंद्र सरकारकडेही सदर माहिती वेळोवेळी पाठवल्याचे WHO चे निरिक्षक डाॅ प्रकाश यांनी नमूद केले.

नागरिकांनी ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील मुलामुलींना ही लस सरकारी रुग्णालय, शाळा,अंगणवाडी येथे २७ नोव्हेंबर पासून शुभारंभ ते ५आठवडे मिळणार असल्याने लाभ घेण्याचे आवाहन डाॅ प्रकाश यांनी केले.

या जनजागृती मोहिमेस जिल्हा परिषद सदस्य मा अतुलदादा देशमुख, पंचायत समिती सदस्य मा अजय पाटील, सौ प्रिती विष्णू चकोर यांचे मार्गदर्शन लाभल्याचे डाॅ प्रमोद सोनवणे यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी जिल्हा सहाय्यक आरोग्य अधिकारी डाॅ समाधान वाघ , डाॅ दिलीप पोटोडे सर, डाॅ प्रमोद पांढरे, डाॅ.संजय सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ देवराम लांडे सर, डाॅ प्रमोद सोनवणे, सेक्रेटरी केतनभाई बुंदेलखंडी, संस्थापक मिलेनियम अध्यक्ष मा. प्रितेशभाई कटारिया व सर्व सन्माननीय सदस्य व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.