(श्री. सतिष एस राठोड) ✍
नवी दिल्ली :- ‘इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ‘हॅक’ करण्यासाठी ‘रिलायन्स जिओ’ने भाजपला कमी तरंगलांबीचे ‘सिग्नल’ पुरवले आसल्याचा दावा सय्यद शुजा यांनी अमेरिकास्थित सायबर तज्ज्ञाने केला आहे.
राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूक देखील भाजपने जिंकली असती,’ पण आमच्या ‘टीम’ने भाजापचे प्रयत्न हाणून पाडले आहे.
शुजाने ‘स्काइप’द्वारे लंडन येथे पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएमबाबत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. इंडियन जर्नलिस्ट्स असोसिएशनने (युरोप) ने ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. “माझ्या सहकाऱ्यांवर हल्ले झाले असून. काही सहकाऱ्यांचे खून झाल्यानंतर घाबरून मी २०१४ मध्ये परदेशात पळून आल्याचे स्पष्ट केले आहे.
भाजप व इतर पक्षांनाही ईव्हीएम गैरव्यवहार कसा करतात हे माहीत आहे. “दिल्लीतील २०१५ मधल्या निवडणुकीतही घोळ झाला असता, पण वेळीच दुर्घटना रोखली आणि आम आदमी पक्षाने ७० पैकी ६७ जागा जिंकल्या.
ईव्हीएमचा आराखडा तयार केलेल्या इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (ईसीआय) ते स्वतः होते, मतदान यंत्रे हॅक कशी करतात हे सिध्द करुन दाखऊ शकतो, असा दावाही शुजाने केला आहे.