लातूर ः दि.15 ऑक्टोबर रोजी राज्यभर बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी श्री हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली डफडा बजाव अंदोलन जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजातील कार्यकर्त्यांनी डफडा बजाव आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले अशी माहिती राष्ट्रीय बंजारा क्रांतीदलाचे प्रदेशाध्यक्ष अंकुश जाधव, लातूर जिल्हाध्यक्ष सुरेश चव्हाण, महिला आघाडी अध्यक्षा उषाताई राठोड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिले आहे.
यावेळी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करतांना अंकुश जाधव, सुरेश चव्हाण, सुरेश राठोड, भटक्या विमुक्तांचे राजेंद्र वनारसे, बंजारा महिला अघाडी अध्यक्षा सौ.उषाताई राठोड, सौ.सरस्वती जाधव, सुमन श्री राठोड, विलास जाधव, अशोक चव्हाण आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत. 1. बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीप्रमाणे आरक्षण देवून 7 टक्क्याहून 14 टक्क्यावर करावे. 2. बंजारा समाजासाठी असणारी क्रिमिलियरची जाचक अट रद्द करावी. सरकारी कर्मचार्यांच्या बढतीमधील प्रमोशन कायम ठेवावे. बंजारा भाषेला राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा. तांडा सुधार समिती योजनेसाठी भरघोस आर्थिक तरतूद करण्यात यावी. कै.वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळास भरीव आर्थिक तरतूद करावी. तसेच लातूर शहरातील कै.वसंतराव नाईक साहेब यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याकरिता मनपाने दिलेली जागा त्वरीत बंजारा समाजाच्या ताब्यात द्यावी ही आग्रही मागणी यावेळी श्री अंकुश जाधव यांनी केली. याप्रसंगी उपस्थितांचे आभार सौ.उषाताई राठोड यांनी मानले.
दि. १५.१०.२०२०
माननीय मुख्यमंत्री साहेब ,
महाराष्ट्र राज्य, मंत्रालय ;
मुंबई.
यांचे सेवेशी, महाराष्ट्रातील समस्त गोर-बंजारा समाज/ विमुक्त-भटके यांचेकडून सविनय सादर …..
मार्फत रवाना:—–
मा. जिल्हाधिकारी साहेब ( जिल्हाधिकारी कार्यालय)
.नंदुरबार ……. जिल्हा
मा. तहसीलदार साहेब ( तहसीलदार कार्यालय शहादा ….तालुका
१५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर “डफडा-बजावो आंदोलन”
खालील प्रलंबित मागण्या मंजूर न झाल्यास गोर-बंजारा समाज आपले आंदोलन अधिक तिव्र करणार
मुख्यमंत्री महोदय जी ,
श्री. हरिभाऊजी राठोड साहेब (माजी खासदार व आमदार ) यांनी वेळोवेळी विधी मंडळात बंजारा/ विमुक्त-भटक्या समाजाच्या प्रश्न उपस्थित केले होते.
१)बंजारा/ विमुक्त-भटक्याचे आरक्षण वाढवून देण्याबाबत २) क्रिमीलेयर ची अट रद्द करणे ३) बढतीमधील आरक्षण ४) वसंतराव नाईक तांडा-सुधार योजना ५) राज्यातील संपूर्ण तांडयास महसुली दर्जा ६) भारतातील ११ कोटी लोकसंख्या असलेल्या गोरबोली भाषेला, राष्ट्रीय भाषा सुचीत दर्जा देणेबाबत
७) गोर-बंजारा / विमुक्त-भटक्याचे आरक्षण ३% वरून कमीतकमी ४% पर्य॔त वाढवून त्वरीत लागू करण्याबाबत
सरकारने वेळोवेळी आश्वासन देऊनसुध्दा समाजाचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत.
अशा अनेक ज्वलंत प्रश्नावर सरकारकडून आश्वासन मिळूनही प्रश्न मार्गी न लागल्याने महाराष्ट्र राज्यातील १.२५ कोटी बंजारा / विमुक्त-भटक्या समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी मान. हरिभाऊजी राठोड ( माजी खासदार व आमदार) यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाज येत्या १५ ऑक्टोबर २० रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण ( जिल्हा व तालुका पातळीवर) जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय येथे डफडा वाजवून पुर्ण शांततेने व संवैधानिक मार्गाने “डफडा- बजावो आंदोलन” करून बंजारा /विमुक्त- भटक्याच्या न्याय हक्कासाठी सरकारला मागण्याचे लेखी निवेदन देत आहोत.
मा. जिल्हाधिकारी साहेब/ नंदुरबार मा. तहसीलदार साहेब शहादा आपणास आम्ही विनंती करतो की, सदर निवेदनाची आपल्या कार्यालयात नोंद घेऊन, सदर निवेदन मा. मुख्यमंत्री साहेब यांना मुख्यमंत्री कार्यालय मुंबई येथे रवाना करावे अशी नम्र विनंती आहे. आपले नम्र
चेनसिंग राठोड निभोरा जेस्ट सलागार
ठाणसिंग चव्हाण चिखली खुर्द
राष्ट्रीय बंजारा क्रांतीदल प्रदेश उप अध्येक्ष
रामसिंग राठोड कुसमवाडे
राष्ट्रीय बंजारा क्रांती दल प्रदेश उप अध्येक्ष
हेमराज चव्हाण उजळोद
राष्ट्रीय बंजारा क्रांती दल जिल्हा अध्यक्ष नंदुरबार
रघुनाथ जाधव दुधखेड
भारतीय बंजारा क्रन्ति दल जिल्हा
अध्यक्ष नंदुरबार
शिवाजी चव्हाण मंदाना
भारतीय बंजारा क्रांती दल जिल्हा कार्याध्यक्ष नंदुरबार
मेहताब जाधव कानडी
भारतीय बंजारा क्रांतीदल
सरचिटणीस नंदुरबार
रविंद्र राठोड शहादा
राष्ट्रीय बंजारा टायगर
प्रदेश संघटक
अविनाश चव्हाण दुधखेड
राष्ट्रीय बंजारा टायगर
विधार्थी प्रदेश अध्यक्ष
किशन पवार मंदाना
मोहन राठोड उजळोद
संजय चव्हाण दुधखेडा
मनोज जाधव दुधखेडा
इतर कार्यकर्ते उपस्थित होते
दिनांक:- 15/ 10/2020
डफडा- बजावो आंदोलनाचे नेतृत्व मा.श्री हरिभाऊजी राठोडसाहेब (माजी खासदार व आमदार) मो. 9920716999/ 7977998747
*मुख्य समन्वयक -ठाणशिग चव्हाण 8975035701
उप समन्व्यक रघूनाथ जाधव
Tag : Banjara Morcha, Banjara Dafada Vajao aandolan, Banjara Rally