दि ग्रेट आदर्श क्रिडा मंडळ, लोणजे व लोक उध्दार फाउंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमातुन शवपेटी, तिरडी व अंत्यविधी आधी अंघोळीसाठी लागणारी खुर्ची लोकार्पण कार्यक्रम संपन्न

♦ आपल्या संस्कृतीमध्ये एक सुंदर वचन आहे, ‘एकमेका_सहाय्य_करू_अवघे_धरू_सुपंथ’. पण बरेचदा या मागची भावना जनसामान्यांना कळतच नाही. पूर्ण टिम या वचना प्रमाणे आपले कार्य करत आहे.

♦ भरतभाऊ पवार आणि नोकरदार मित्र परिवार खुप छान प्रकारे उपक्रम हाती घेतला आहे.

♦ महाराष्ट्रात पहिलाच असा उपक्रम गावातील नोकरदार वर्गांनी एकत्र येऊन सुरु केलेला आहे.

♦ उपक्रमातुन गावासाठी शवपेटी , तिरडी व खुर्ची लोकार्पण करुन गावा विषयी एक आत्मियता दाखविली आहे.

♦ प्रत्येक गावातील नोकरदार वर्गांनी अशा प्रकारचा उपक्रम राबवायला हवा…

♦ जरी आपण नोकरी निमित्ताने बाहेर असलो तरी आपली नाळ ही गावाशी जुळलेली असते…आपण हे विचार करायला हवा कि, ज्या गावात जन्माला आलो, त्या गावासाठी काहीतरी वेगळे, आणि हटके करायला हवे…..

♦ आज लोणजे येथील नोकरदार वर्ग जरी नोकरी तसेच व्यवसाय निमित्ताने बाहेर असतील….पण त्यांचा गावा विषयी असलेला लळा हा या उपक्रमातून दिसत आहे….

♦ भरतभाऊ पवार व नोकरदार मित्र परिवार आपल्या या कार्याला कोटी कोटी प्रणाम !!!!!!!!!!!

श्री. सतिष एस राठोड ✍

चाळीसगांव (लोणजे):- काल दि.२१/०३/२०१९ गुरूवार होळी सणाच्या निमित्ताने दि ग्रेट आदर्श क्रिडा मंडळ , लोणजे व लोक उध्दार फाउंडेशन यांच्या माध्यमातून गावासाठी शवपेटी, तिरडी व अंत्यविधी आधी अंघोळीसाठी लागणारी खुर्ची सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा. सुभाष दादा चव्हाण यांनी भुषविले.

  • कार्यक्रमात प्रा.सौ.अश्विनी बाविस्कर मॅडम यांनी ग्रामस्थांना समाजप्रबोधन , महिला सबलीकरण, ग्रामस्थांनी ऐकजुट कसे रहावे, अंधश्रद्धा निर्मुलन, ग्रामस्वच्छता ई. विविध विषयांवर उत्कृष्ट भाषण सौम्य भाषेत समजून सांगितले.
लोक उध्दार फाउंडेशन चे धडाडीचे कार्यकर्ते विजय जाधव ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना
  • त्यानंतर लोक उध्दार फाउंडेशन चे धडाडीचे कार्यकर्ते विजय जाधव यांनी फाउंडेशन मार्फत कोणकोणते कार्य आपल्या माध्यमातून घडणार आहे ते सांगितले व बंजारा समाजातील विविध प्रश्न स्वयंरचित कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला.
बंजारा लाईव्ह चॅनलचे पत्रकार सतिषभाऊ राठोड ग्रामस्थांना मोलाचे असे मार्गदर्शन करतांना
  • तसेच बंजारा लाईव्ह चॅनलचे पत्रकार सतिषभाऊ राठोड यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले. बंजारा समाजातील अनिष्ट रूढी परंपरा बंद करण्यात यावे व ते स्वतः ऐक ऐन.जी.ओ. चालवतात त्यामुळे त्यांचे अनुभव ग्रामस्थांसमोर मांडले.

त्यानंतर मा.प्रा.बाविस्कर सर यांनी शवपेटी चे महत्त्व समजून सांगितले. बंजारा समाजातील कर्मकांड, अनिष्ट प्रथा, बोकड बळीमुळे होणारे नुकसान, देवाच्या नावाने समाजात पसरलेली भिती व भिती मुळे देवाच्या नावाने होणारी लुट इ. विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.

मा.सुभाष दादा चव्हाण यांचे स्वागत करतांना प्रतिष्ठित ग्रामस्थ
  • आपल्या अध्यक्षीय भाषणात मा.सुभाष दादा चव्हाण यांनी गावातील विविध होणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले व प्रशंसा केली कि येणाऱ्या पुढील काळात विविध प्रकारचे चांगले ऊपक्रम राबवावेत. तसेच आर्दश क्रीडा मंडळच्या माध्यमातुन गेल्या २४ वर्षांपासून कबड्डी खेळ चांगल्या पद्धतीने राबविले व त्यातून निरोगी शरीर मिळाले ,खेळाचे महत्व समजून सांगितले.

कार्यक्रमाचे समारोप व आभार प्रदर्शन मा.डॉ. यशवंत पवार यांनी केले. सुत्रसंचालन विजय पवार यांनी कोणाचीही उणीव भासु न देता व उत्कृष्टपणे पार पाडले.

  • म्हणतात ना कि, निती व कर्म चांगले असले की निसर्ग सुध्दा मदत करतो, या उक्तीप्रमाणे आपण राबविण्यात आलेल्या शवपेटी उपयोगात आली. कै.दयाराम सोना पवार यांचे वृद्धपकाळाने निधन झाले व त्यांची मुले व नातेवाईक बाहेरून येणार असल्याने त्यांच्या पार्थिवासाठी शवपेटी चा उपयोग झाला व शवपेटीचे महत्त्व देखील योगायोग लोकांना कळाले.