पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बंजारा समाजाची व कोणतीही चौकशी होण्यापूर्वीच बंजारा

प्रति
मा.मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई मा.उपमुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य,मंत्रालय, मुंबई.

मा. गृहमंत्री
महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई
यांचे सेवेशी.

विषय : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बंजारा समाजाची व कोणतीही चौकशी होण्यापूर्वीच बंजारा ओबीसी बहुजन समाजाच्या राजकीय नेतृत्वाची नाहक होणारी बदनामी थांबविणे बाबत.
महोदय,
ज्या पद्धतीने राज्यातील भाजपचे काही नेते चौकशी पूर्वीच व अंतिम निष्कर्ष येण्यापुर्वीच बंजारा ओबीसी बहुजन समाजातील मंत्री ना.संजय राठोड यांना आरोपी म्हणून व प्रसारमाध्यमात बंजारा बहुजन समाजाला बदनाम करण्याचे कटकारस्थान केले जात आहे. या षड्यंत्राचे समाजाकडून आम्ही निषेध नोंदवितो.
१.पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येबद्दल संपूर्ण समाजाला अतीव दु:ख आहे. समाजमध्यमात जी काही उलटसुलट चर्चा होत आहे, हे अत्यंत निंदनीय आहे.
२. ज्या तरुणीची पुणे येथे आत्महत्या झाली आहे. तिच्या कुटुंबीयांनी आज दिनांकापर्यंत तशी मनुष्यवधाची किंवा हत्येचे कसलीही तक्रार दिलेली नाही. या प्रकरणातील ऑडीओ क्लिप्स देखील संशयास्पद आहे. शिवाय राजकीय स्वार्थापोटी याप्रकरणात प्रसारमाध्यमात समाजाला व वनमंत्री ना.राठोड यांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरु असल्याचे दिसून येते, त्यामुळे समाजात प्रचंड अस्वस्थता आहे.
३. भाजपला नेमका या प्रकरणाचा पुळका आजच कसा काय आला ? यामागे त्यांचे मनसुबे सुद्धा तपासणे गरजेचे आहे. यापूर्वी औरंगाबाद येथील सीमा राठोड, पुण्यातील योगेश राठोड खून प्रकरण शिवाय साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या ‘हिंदू’ या कांदबरीत बंजारा व इतर समाजातील महिलाविषयी केलेले आक्षेपार्ह व असभ्य लेखन तसेच बंजारा समाजातील प्रश्नावर आजवर कधी आवाज उठविले नाही. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, विमुक्त भटक्या बहुजनाचे दैवत मानले जाणारे वसंतराव नाईक साहेबां विषयी भाजपाला आजवर कधी आपुलकी दाखवता आली नाही. मग अचानक पूजा चव्हाण या प्रकरणात समाज बदनाम होईल असे षड्यंत्र करणे, हे सुद्धा तितकेच संशयास्पद आहे.
४ या अत्यंत संवेदनशील प्रकरणात एकामागे एक ऑडीओ क्लिप्स कोठून आणि कोणाच्या षडयंत्राने व्हायरल झाल्यात त्याचा देखील तपास होणे आवश्यक आहे.
महोदय, राज्यातील राजकारणात बंजारा ओबीसी बहुजन नेतृत्व संपवून यवतमाळ व खास करून विदर्भात काही पक्ष आपली राजकीय पोळी भाजण्यासाठीच या प्रकरणात खूप मोठे षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ना.संजय राठोड यांच्यावर भाजपाने राजकीय हेतूने सुरु केलेल्या षडयंञाची शहानिशा झाल्याशिवाय कोणतीही कार्यवाही होऊ नये.
भाजपा कडून राजकीय षड्यंत्र रचून बंजारा ओबीसी बहुजन समाजातील नेतृत्वाला संपविण्याचा प्रयत्न चालविला आहे याची जातीने चौकशी करून त्यांना धडा शिकविण्यात यावा अन्यथा संपूर्ण बंजारा समाज या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरेल.
तरी कृपया पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात समाजमाध्यामात होणारी बंजारा समाजाची व सबंधित कुटुंबियाची कोणतीही तक्रार नसताना व चौकशीपूर्वीच बंजारा ओबीसी बहुजन समाजातील राजकीय नेतृत्वाची नाहक होत असलेली बदनामी थांबविण्यात यावी, ही विनंती. स्थळ: ......................

दिनांक :………………… प्रतिलिपी :

१. मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य