“बंजारा हस्तकलेची शोंकांतिका:एक ऐतिहासिक धरोवर”
याडीकार श्री पंजाब चव्हाण यांनी साहित्य क्षेत्राला आपली अभीनव ओळख दिली.बंजारा संस्कृती ही आपल्या देशातील जुनी संस्कृती.मात्र जागतिकीकरणाच्या युगात या संस्कृतीचा संपूर्ण लोप पावतात की काय ? अशी धास्ती वाटत असतांनी या संस्कृतीचा संपूर्ण चहरामोहरा श्री पंजाब चव्हाण यांनी या पुस्तकाच्या रूपाने समोर आणलेल आहे.या बंजारा समाजातील आदर्श महापुरूष संत सेवालाल महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मलनाचे काम आपल्या विचाराने केले त्यांचे संपर्क मांडणी करतांनी जे म्हणतात, ‘ जो मणक्यान दांडन खाय.वोर सात पिढी नरकेम जाय ‘ बंजारा समाजातील जी भाषा आहे त्याचे सांगंल्या प्रकारे लेखन लेखकांनी केले.बंजारा समाजाच्या शैक्षणीक प्रगती करीता बंजारा भाषेतुन शिक्षण मिळणे गरजेचे आहे.हा विचारही त्यांनी मांडला पोहरा देवीच्या वारीचे विश्लेषन त्यांनी केले केवळ प्रवास वर्णन न करता तेथल्या गैरसोयी त्यांनी त्यांनी दृष्टीस आणुन दिल्या.
बंजारा समाजातील उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय वसंतराव नाईक त्यांच्या कार्याची स्मृती या पुस्कात शब्दबद्ध केला आहे.जलनायक सुधाकरराव नाईक यांच्या कामाची कृती आलेख त्यांनी या पुस्तकात दिली आहे.लक्षमन मानेच्या धर्मांतरावर केलेले भाष्य एक माणुस म्हणुन विचार करायला आपल्याला बाध्य करते याही पलिकडे जावुन हरिभाऊ राठोड असो मनोहरराव नाईक असो वा कांशीरामजी यांचे कामाचे प्रतिबिंब लेखकाने पोटतिडकिने यात मांडले आहे.बंजारा कर्मचारी संघटनेचे एकिकडे राजकीयकरण होत आहे.मात्र दुसरी कडे शासन दरबारी बंजारा समाजाच्या हिताचे ठोस निर्णय घेतल्या जात नाही.ही शोकांतिका लेखकांने मांडली आहे.बंजारा हस्तकला भारतातील 22 राज्यात आणि जगभरातील 17 देशात आपल्या कलात्मकतेचा ठसा कशाप्रकारे सोडते आहे. हे त्यांनी समाजा समोर मांडले.महाराष्ट्रातील बंजारा समाज हा त्यांची स्मरणिय स्मारके सुक्ष्म अभ्यास करून त्यांनी कथीत केले आहे.
वेगवेगळ्या राज्यात बंजारा समाजाचे लोक विकासा बद्दल वेगवेगळ्या कार्यशाळा घेतात यातील बऱ्याच कार्यशाळेला लेखक स्वत:हजर राहील्यामुळे तेथिल वृत्तांत काही लेखाद्वारे मांडुन त्यांनी या पुस्तकात त्यांच्या समावेस केला आहे.बंजारा समाज भुषन पुरस्काराने या समाजांच्या भल्यातील काम करणाऱ्याचे मनोधर्य वाढावे म्हणुन या पुरस्काराचे मुल्य फार मोठे आहे असे लेखकाला वाटते. बंजारा समाजाच्या प्रगती करीता डाँ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचारास प्रगतीशील ठरू शकते हा ठाम विचार लेखकाला आहे.कारण चालु स्थितीत बंजारा लोक गाण्याच्या अज्ञाना पेक्षाही व्यावस्थेच्या पुजाऱ्यांची कटकारस्थाने बंजारा समाजाच्या विकासाला कश्या प्रकारे बाधा आणते हे त्यांनी समजावुन दिले या करीता धम्माची प्रेरणा बंजारा समाजाला प्रेरक ठरले.कारण बुद्धाने संपूर्ण जगाला निरीश्वरवादी आणि मानवतावादी दृष्टीकोन दिलेला आहे….
:लेखक श्री पंजाबराव लालसिंग चव्हाण
(याडीकार)
श्रीरामपुर पुसद जि.यवतमाळ.
संपर्क: 9552302797
मनोगत:-
जय सेवालाल भाईयों
मि ज्या मानवा कडे बघुन लहानाचा मोठा झालो तो माणुस म्हणजे आमचे फुपा साहेब याडीकार श्री पंजाबराव एल.चव्हाण.हे आमच्या साठी खुप अभिमानाची गोष्ट आहे.
त्यांच्या प्रत्येक गोष्टी आम्हाला प्रेरणादायी वाटतात व त्याच्या प्रत्येक गोष्टीचे विचार करून आम्ही जिवनांत चांगल्या प्रकारे यश मिळवित आहे.आजपर्यंत त्यांनी बंजारा समाजातील संस्कृतीपासुन तर समाज सुधारना पर्यंत त्यानी लिहलेली पुस्तके असी. 1)याडी 2) शिकारी राजा.3) बंजारा हस्तकलेची शोकांतिका:एक धरोवर.अशा अनेक प्रकारचे सर्व पुस्तके आम्हाला वाचनासाठी देऊन आम्हाला बळ दिल्या बद्दल फुपासाहेब खुप खुर धन्यवाद असेच आम्हाला तुमच्या कडुन बळ मिळो व तुमच्या प्रत्येक पुस्तकाला येश मिळो हि संत सेवालाल चरणी प्रर्थना…
सौजन्य: गोर कैलास डी.राठोड
स्वयंसेवक गोर बंजारा संघर्ष समिती भारत,
संस्थापक/अध्यक्ष
जय सेवालाल बंजारा सेवा संस्था ठाणे महा.रजि.(NGO) व सेवादास वाचनालय सावरगांव बंगला ता.पुसद जि.यवतमाळ.
संपर्क:- 9819973477
Tag: Banjara Culture, Banjara handicrafts, Lamani, Lambani, Bazigar