बरेच दिवस झाले डॉक्टर मी आहे पहात ! डॉक्टर तुम्ही अजुनही अँडमिटच आहात..!! कवी. निरंजन ब. मुडे.

डॉक्टर

©®कवी. निरंजन ब. मुडे.
दि. २०/१०/२०१८

केईएम,सायन,नायर सारख्या मोठमोठ्या शासकिय, निमशासकिय रूग्णालयात अहोरात्र सेवा देणा-या निवासी-अनिवासी डॉक्टरांना समर्पित….

बरेच दिवस झाले डॉक्टर मी आहे पहात !
डॉक्टर तुम्ही अजुनही अँडमिटच आहात..!!

किती पेशंट येतात
बरे होऊन जातात…
रडत रडत येतात
हसत हसत जातात…
*बाहेर जात होता तो आभार वहात !*
*डॉक्टर तुम्ही अजुनही अँडमिटच आहात..!!*

चाळीस-पन्नास रूग्णा पुरते
असतो वार्डचा ताबा…
पेशंट इतके येतात
जसे लोकलचा प्रवासी डब्बा…
*शेकडो रूग्णांना उपचार देतात दोन हात !*
*डॉक्टर तुम्ही अजुनही अँडमिटच आहात..!!*

जिवंत देवापैकी एक
तुम्हालाच मानतात…
नवस फेडण्यासाठी
तुमच्याकडे व्याधीच आणतात…
*बरे होण्यासाठी उभे राहतात आस्थेने पहात !*
*डॉक्टर तुम्ही अजुनही अँडमिटच आहात..!!*

बरेच दिवस झाले डॉक्टर मी आहे पहात ! डॉक्टर तुम्ही अजुनही अँडमिटच आहात..!! कवी. निरंजन ब. मुडे.

कुठूनतरी येतो
बाहेरचा मार खाऊन…
नातेवाईक येतात
तुमच्या अंगावर धाऊन…
*धरतात धारेवर’ जसे वाघाच्या गुहात !*
*डॉक्टर तुम्ही अजुनही अँडमिटच आहात..!!*

नेता असो’ वा असो पुढारी
वा असो कोणी अँक्टर…
माणंसातला देव असेल तर
तो आहे फक्त डॉक्टर….
*पडत नाही तुम्ही कोणत्याच मोहात !*
*डॉक्टर तुम्ही अजुनही अँडमिटच आहात..!!*

एक रात्र रूग्णासोबत थांबून
झालो होतो आम्ही हताश…
डॉक्टर तुम्ही पण दिसत होता
अॉन ड्युटी चोवीस तास…
*बरेच दिवस झाले डॉक्टर मी आहे पहात !*
*डॉक्टर तुम्ही अजुनही अँडमिटच आहात..!!*

©® *कवी. निरंजन मुडे*
*नेरुळ नवी मुंबई.*
९०८२१९९८६७