भारतीय बंजारा समाज, कर्मचारी सेवा संस्था, कल्याण यांच्या वतीने पद्मश्री तथा दलित मित्र कै.रामसिंग भानावतजी यांची ११२ वी जयंती साजरी

  • भारतीय बंजारा समाज, कर्मचारी सेवा संस्था, कल्याण यांच्या वतीने शुक्रवार दि.१७ रोजी पद्मश्री तथा दलित मित्र कै.रामसिंग भानावतजी यांची ११२ वी जयंती साजरा करण्यात आली. तसेच महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी, शहीद मेजर कौस्तुभ राणे, बंजारा समाज सेवक उदयजी राठोड व भानावतजींचे सुपुत्र सुभाष भानावत, बीएमसी कर्मचारी श्याम राठोड या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

तसेच आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी कै.रामसिंग भानावतजी यांच्या जीवन प्रवासा बद्दल माहिती दिली. त्यांनी केलेल्या कार्याचा प्रसार घराघरा पर्यंत पोहचविण्यात यावा यासाठी आपण प्रयत्न करावे असेही सांगितले.

पद्मश्री रामसिंगजी भानावत यांचे योगदान देशासाठी खूप मोलाचा आहे. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन इंग्रजांना पळवून लावण्यासाठी आचार्य विनोबा भावे, दादा धर्माधिकारी यांच्या सोबत सहभाग घेऊन इंग्रजांना सळो की पळो करून सोडले, तसेच गावो गावी जाऊन समाजकार्य केले महाराष्ट्र तसेच भारत देश सुजलाम् , सुफलाम् ! व्हावा यासाठी त्यांचा खारीचा वाटा आहे रामसिंगजी भानावत हे सत्ता पद,संपत्ती, प्रसिद्धीसाठी कधी पुढे आले नाही तसेच त्यांनी त्यांच्या सभा खेड्यातच घेऊन समाज प्रभोधनाचे कार्य केले. खेडो पाडी जाऊन शिक्षणाचे महत्व पटवून दिले. व शिक्षण घ्यायला भाग पाडले. गावोगावी शाळा कॉलेज व विद्यार्थांना वस्तीगृह उपलब्ध करुन दिले. आज आपण शिक्षण घेऊन इथे बसलो आहे. ती भानावतजी यांचीच देण आहे, तसेच त्यांचे कार्य आपल्याला विसरून चालणार नाही हे पटवून दिले व त्यांच्या प्रेरणे नुसार कार्य करावा असे मा. अनिल राठोड यांनी संबोधित केले.

तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा राधेश्याम आडे (राष्ट्रीय संघटक भा.बं.स.क.से.सं), प्रमुख अतिथी मा. शिवचरण शेरे (माजी सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन), मा. अनिल साळुंखे (राष्ट्रीय अध्यक्ष आ.भा.राजपूत भामटा युवक आघाडी), मा. उल्हास राठोड (बं.इं.फो), अतिथी मा. अंबरसिंग चव्हाण (महासचिव भा.बं.स.क.से.सं), मा.सुदाम जाधव (सहाय्यक आयुक्त, भिवंडी महानगरपालिका), मा. एकनाथ राठोड (सचिव-मुख्य कार्यालय, भा.बं.स.क.से.सं), मा.सुरेश पवार (कोषाध्यक्ष,महाराष्ट्र प्र. भा.बं.स.क.से.सं), आणि विशेष सत्कारमूर्ती मा.शेषराव. मो.राठोड (प्रमुख कामगार अधिकारी, बृ.मुं.मनपा), मा.डी.सी. राठोड(सह प्रमुख कामगार अधिकारी बृ.मुं.मनपा) हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. सूत्रसंचालन मा. आत्माराम चव्हाण हे करत होते, व आभार प्रदर्शन सुभाष राठोड यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल राठोड, सुभाष राठोड, आत्माराम चव्हाण, विट्ठल पवार, प्रा. देवीसिंग राठोड, रमेश शेरे, भास्कर राठोड, जयसिंग राठोड, धर्मा राठोड, अॕड. संतोष राठोड, कैलास चव्हाण, ईश्वर राठोड, सुधीर राठोड, नामदेव पवार, अर्जुन राठोड, व मदन राठोड यांनी परिश्रम घेतले.