भावपुर्ण श्रंध्दाजली: स्व, पुजाबाई मोरसिंग राठोड

*भारतीय बंजारा/बहुजन क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा, मोरसिंग भाऊ राठोड यांच्या धर्मपत्नी स्व, पुजाबाई मोरसिंग राठोड यांचे प्रदीर्घ आजाराने आज दुखद निधन झाले,* *गेल्या अनेक दिवसापासून पुजाबाईंच्या आजारावर मात करण्यासाठी ,मोरसिंग भाऊंनी जिवाची पराकाष्टा केली, चांगल्या तज्ञ डॉक्टरांकडे ऊपचार केला, पाण्यासारखा पैसा ओतला, अशा परस्थितही समाजाकडे दुर्लक्ष न करता समाजाची वास्तव परीस्थिती लक्षात घेऊण राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भारतीय बहुजन क्रांती दल पक्षाची स्थापणा केली, स्व ,पुजाबाई दुर्दम आजाराशी संघर्ष करतांना सामाजिक कार्यात मोरसिंग भाऊंच मनोबल टिकून राहावा याकरीत पुजाबाई भाऊंना नेहमी प्रोत्साहण देत राहायचे,* *भाऊंच्या संघटणेत काम करतांना अनेकवेळा पुजाबाई यांना भेटण्याचा योग आला, त्या म्हणायच्या कि आपला समाजाची अवस्था खुप बिकट आहे, लहाणपणी पाहीलेला तांडा आजही त्याच अवस्थेत पाहून दुख होते, यासाठी भाऊंनी मोठे कार्य हाती घेतले आहे त्याला समाजाची भक्कम साथ हवी आहे, यासाठी तुमची मेहणत खुप गरजेची आहे, भाऊंना साथ द्या निश्चितच ऐक दिवस समाजात बदल होईल,*
*ताईंचे हे शब्द आम्हा सारख्या कार्यकर्त्याला प्रेरणा देणारे होते, आपल्या चाळीसगाव संघटनेच्या माध्यमातून जेव्हा तालुक्यात बंजारा लोकनृत्य लेंगी स्पर्धेचे कार्यक्रम झाले होते त्यावेळी पुजाबाई आपल्या सहपरीवारासह तीन दिवस ऊपस्थित होत्या, त्यावेळी मी संघटनेत जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत होते, कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनची जबाबदारी पार पाडतांना पुजाताईंनी माझे कौतुक करतांना सांगितले होते की, खुप कमी तरूण वयात चांगल वक्तृत्व शिकला आहेस, तुझी संघटनेला फार गरज आहे, समाजाला जागृत करण्यासाठी प्रबोधन काळाची गरज आहे, आणि तुझ्यात प्रबोधनपर कौशल्य दडलेलं आहे, भाऊंना तुझ्यासारख्या कार्यकर्त्याची गरज आहे, भविष्यात संघटणेत कुणाकडून चुकून दुखावला तरी भाऊंची साथ सोडू नको,*
*पुजाताईंच्या सकारात्मक प्रतिसादामुळे दुंखद प्रसंगातही मोरसिंग भाऊंना सामाजिक कार्य करण्याची ऊर्जा मिळत होती, आज जे बहुजन क्रांती दल हा राजकीय पक्ष आस्तित्वात आला आहे त्यामागे पुजाताईंचे मोठे धाडसी सहकार्य होते,*
*ताईंने आपल्या आजारपणाकडे न पाहता पक्ष स्थापनेच्या कामात* *भाऊंना मोठी हिम्मत दिली आहे*,
*ताईंनी पाहीलेल स्वप्न साकार* *करणे हिच खरी संघटनेतील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची श्रध्दांजली ठरेल,*
*मोरसिंग भाऊंना व सर्व राठोड परीवाराला प्रमेश्वर हे दुख सहण करण्याची शक्ती देवो,* *पुजाबाईंच्या आत्म्यास चिर शांती लाभो अशी प्रभू चरणी प्रार्थणा????*
*भावपुर्ण श्रंध्दाजली*
*शोकाकुल : समस्त समाज बांधव*