महसुल राज्यमंत्री मा.ना.संजयभाऊ राठोड यांचा जळगांव जिल्हा दौरा उत्साहात संपन्न

(श्री. सतिष एस राठोड)

जळगांव :- महाराष्ट्र राज्याचे महसुल राज्यमंत्री तथा बंजारा समाजाची मुलूख मैदानी तोफ मा.ना.संजयभाऊ राठोड यांचा ‘जळगांव,जामनेर,चाळीसगांव व कन्नड दौरा’ अतिशय उत्साहात संपन्न झाला.

यावेळी ना.संजयभाऊ राठोड यांनी जळगांव येथे पत्रकार परीषद मधे समाजाच्या विविध समस्यांविषयी आढावा घेतला आणि दि.३ डिसेंबर २०१८ (सोमवार) रोजी ‘तिर्थक्षेत्र पोहरादेवी, वाशिम.’ येथे संपन्न होणाऱ्या भव्य अशा ‘संत सेवालाल महाराज यांच्या नंगारा भवन (वास्तूसंग्रहालय) भुमिपुजन सोहळ्याविषयीचे सर्व समाजबांधवांना आमंत्रण देऊन त्यांच्या खात्याने सामान्य जनतेसाठी घेतलेले ऐतिहासिक निर्णय असल्याचे याविषयी माहिती दिली.

यावेळी ना.संजयभाऊ राठोड हे महसुल राज्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच जळगांव, जामनेर, चाळीसगांव दौऱ्यावर आल्याने बंजारा समाजबांधवांचा उत्साह वाहत होता. तसेच संपूर्ण जळगांव जिल्ह्यातील बंजारा समाजबांधव आणि शिवसेना पदाधिकारी यांच्यातर्फे ना.संजयभाऊ राठोड हे ज्या मार्गाने जात होते त्यावेळी त्यांचा अतिशय उत्साहाने, ढोल ताशा व बंजारा संस्कृती प्रमाणे “पहूर,मालखेडा,आंबेवडगांव,पाचोरा,भडगांव” याठिकाणी स्वागत आणि सत्कार करण्यात आला.

यावेळी, मा.ना.संजयभाऊ राठोड यांच्यासोबत AIBSS चे राष्ट्रीय अध्यक्ष-मा.राजुसिंग नाईक,राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष-मा.आत्मारामभाऊ जाधव,राष्ट्रीय महासचिव-वाल्मिकभाऊ पवार,राष्ट्रीय सरचिटणीस-अनिलभाऊ पवार,राष्ट्रीय संघटक-मुरलीभाऊ चव्हाण,राष्ट्रीय खजिनदार-राजेशजी नाईक,प्रदेशाध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,जिल्हा शल्य चिकीत्सक-डॉ.नागोजी चव्हाण,गटविकास अधिकारी-सुभाष जाधवसाहेब,प्रदेश संघटक-जगदिशभाऊ राठोड,प्रदेश प्रवक्ता-रतिलाल चव्हाण,अ.भा.बंजारा सेना राष्ट्रीय अध्यक्ष-कांतिलालभाऊ नाईक,सामाजिक कार्यकर्ता-मा.पोपटराव नाईक,मोरसिंग राठोड(भडगांव),देशमुख राठोड(एरंडोल),जामनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती-संजयभाऊ देशमुख,उपसभापती-दिपकभाऊ चव्हाण,जामनेर पंचायत समिती चे मा.उपसभापती-गोपालभाऊ नाईक, डॉ. तुषार राठोड , मा.पं.स.सदस्य-दौलतभाऊ पवार,सामाजिक कार्यकर्ते-नामदेवराव चव्हाण,दलितमित्र-मोरसिंगभाऊ राठोड,ओंकारआबा जाधव,राजु चव्हाण,रावेर येथील सामाजिक कार्यकर्ते-रविंद्र पवारसाहेब,चतरसिंग राठोडसर,इ.मान्यवर उपस्थित होते.तर,कार्यक्रम यशस्वीतेसाठी-जळगांव जिल्हा संघटक-अनिल नाईक, जिल्हा सरचिटणीस-सिताराम पवार,जिल्हा सचिव-भरत पवार,जळगांव महानगराध्यक्ष- दयाराम तंवर,जामनेर येथील युवासेना जिल्हा उपाध्यक्ष-ॲड.भरत पवार,बंजारा सेना जिल्हाध्यक्ष-लालचंद चव्हाण,राष्ट्रीय बंजारा टायगर्स तालुकाध्यक्ष-गणेश राठोडसर,सामाजिक कार्यकर्ते-नटवर चव्हाण,बाळू चव्हाण,विकास तंवर,नवल चव्हाण,कैलास राठोड,श्रीराम राठोड,पंडित पवार,मंगल राठोड,यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

यावेळी संपूर्ण जळगांव जिल्ह्यातून कमीतकमी ५००० समाजबांधव दि.३ ‘डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘पोहरादेवी जि,वाशिम’ येथील ‘नंगारा भवन (वास्तू संग्रहालय)’ च्या भुमिपुजन समारंभ सोहळ्यास उपस्थित राहतील असा अंदाज आहे.