वसई , (प्रतिनिधी) मच्छिद्र चव्हाण
काल दि.२७ जुलै रोजी वालीव गाव येथे सालाबादप्रमाणे यावर्षी सुध्दा गोपालदास बापू मंदिरामध्ये गुरू पौर्णिमा निमित्त भंडारा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय सैनिक संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रशांत पाटील, मुंबई प्रदेश अध्यक्ष पंजाबराव मुधाने,उपाध्यक्ष प्रेम शंकर गुप्ता, कोषाध्यक्ष विलास पवार,मुंबई प्रदेश सचिव राजेश दोके, मुंबई जिल्हा अध्यक्ष रमेश कुकरुल, पालघर जिल्हा अध्यक्ष बिस्मिल्लाह खान, पालघर जिल्हा महिला अध्यक्ष प्रणाली कासले, पालघर जिल्हा युवा कमांडर अविनाश ठाकूर, पालघर कोषाध्यक्ष मारुती दानसीलकर,पालघर संघटक संतोष पेलेकर, मुंबई प्रदेश प्रसारक डॉन साहेब, वसई तालुका अध्यक्ष विजय चव्हाण, पत्रकार मच्छिद्र चव्हाण,वसई तालुका सरचिटणीस खवतोंडे, वसई तालुका सचिव दीपक बोबले,वसई तालुका कार्याध्यक्ष परेश परब,वसई शहर विभाग अध्यक्ष सुरेश राठोड, कार्यकर्ते भरत आडे,सुदाम राठोड,नाना जाधव,राजू चव्हाण हे उपस्थित होते व मुंबई,पालघर,व ठाणे जिल्ह्यातून शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सैनिक संस्थेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष पंजाबराव मुधाने,व कार्याध्यक्ष शमसेर ठाकूर यांनी केले होते.