विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद (अखिल भारतीय) संघटनेची महाराष्ट्र राज्य कार्यकारणी जाहीर

राज्य अध्यक्ष पदी श्री.दिलीप धोत्रे यांची तर राज्य कार्यवाह पदी श्री.अनिल फड यांची निवड जाहीर.
——————————————————-

मुंबई :- काल रविवार दि.२१ अाॅक्टोबर २०१८ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत देशभरातील भटक्या-विमुक्त समाजाकरीता कार्य करित असलेल्या विमुक्त,घुमंतु जनजाती विकास परिषद या संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय विमुक्त घुमंतू अर्धघुमंतू जनजाती अायोग,भारत सरकार चे माजी अध्यक्ष कर्मवीर दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील भटके-विमुक्तांच्या न्याय व हक्कासाठी कार्य करित असलेल्या विविध संस्था,संघटना व कार्यकर्त्यासाठी एकदिवसीय राज्य पातळीवरील विचार मंथन बैठक,भटके विमूक्तांची सद्दस्थिती, विविध प्रश्न, विविध अायोग,सरकारची भुमिका,योजना यावर मुक्त चर्चा,संवाद, प्रश्नोतरे व मार्गदर्शन शिबीर संघटनेचे केंद्रिय कार्यालय,स्व.शैलजा विजय गिरकर समरसता सभागृह,राजर्षी शाहु महाराज संस्कार केंद्र,फुलपाखरु उद्यान,मागाठाणे डेपो समोर,बोरीवली (पुर्व) येथे अायोजित केले होते. या एकदिवसीय शिबीरासाठी भटके विमुक्त प्रवर्गातील विविध संस्था,संघटना यांच्या जवळपास २५० प्रतिनीधींनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन खा.गोपाळजी शेट्टी,मा.दादा इदाते यांनी दिपप्रज्वलन,भारत मातेची प्रतिमा अाणि पवित्र भारतीय संविधानाची पुजा करुन व पुष्प अर्पण करुन केले.

यावेळी नगरसेविका सौ.सुरेखा फड पाटील,,राष्ट्रीय कार्यवाह राजेंद्र वनारसे,कार्यक्रमाचे संयोजक मुंबई विभाग अध्यक्ष श्री.सहदेव रसाळ यांची उपस्थित होती.
समारोपासाठी प्रमुख पाहुनणे म्हणून माजी मंत्री अा.विजय (भाई)गिरकर यांची उपस्थिती लाभली.

यावेळी संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी मा.सौ.कांचनताई खाडे(नाशिक)* यांची निवड जाहीर करण्यात अाली. तसेच अादरणिय दादा इदाते यांनी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारीणीची घोषणा यावेळी केली व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान केली व पुढील कार्यासाठी अाशीर्वाद अाणि शुभेच्छा दिल्या.

-: राज्य कार्यकारणी खालीलप्रमाणे अाहे :-

विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद (अखिल भारतीय) महाराष्ट्र राज्य कार्यकारीणी
—————————————————

राज्य अध्यक्ष:-मा.श्री.दिलीपजी धोत्रे (लातुर)
उपाध्यक्ष:-मा.सौ.संपदा पारकर (रत्नागिरी)
उपाध्यक्ष:-मा.श्री.माणिकजी रेणके (नांदेड)
उपाध्यक्ष:-मा.श्री.देविदासजी भिसे (मुंबई)
उपाध्यक्ष:-मा.श्री.बापुसाहेबजी शिंदे (नाशिक)
उपाध्यक्ष:-मा.श्री.राजुजी बर्गे (मुंबई)
उपाध्यक्ष:-मा.श्री.नितीनजी गिरी (ठाणे)
उपाध्यक्ष:-मा.श्री.अर्जुनजी भोई (ठाणे)
राज्य कार्यवाह:-श्री.अनिलजी फड (कल्याण)
सहकार्यवाह:-श्री.दिलीपजी परसने (बुलढाणा)
सहकार्यवाह:-श्री.जगदिशजी चित्रकथी (नंदुरबार)
कोषाध्यक्ष:-श्री.यशवंत वैदु (पनवेल)
सहकोषाध्यक्ष:-श्री.बी.टी.मोरे (रत्नागिरी)
प्रसिध्दीप्रमुख:-श्री.कश्यपकुमार सांगळे (बीड)

-: राज्य कार्यकारणी सदस्य:-
मा.श्री.विवेकजी इदाते (रत्नागीरी)
मा.श्री.तुषारजी पोटे (अहमदनगर)
मा.डाॅ.श्री.लक्ष्मणजी जाधव (बीड)
मा.श्री.संजयजी शेलार (ठाणे)
मा.श्री.शिवाजी गोसावी (सांगली)
मा.श्री.सुभाषजी राठोड (कल्याण)
मा.श्री.अशोकजी पवार (मुंबई)