संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात देखील मोतिमाता यात्रोत्सवाचे आयोजन

दि.20’जानेवारी-2019 रोजी ‘निंबायती तांडा’ येथे मोतिमाता देवीचा यात्रोत्सव

जरंडी,ता.सोयगांव येथून जवळच असलेल्या ‘निंबायती तांडा,ता.सोयगांव’ येथे ‘बंजारा समाजाची कुलस्वामिनी-मोतिमाता देवी’ चे जागृत देवस्थान असुन या देवीचा यात्रोत्सव ‘दि.20/1/2019(रविवार) आणि दि.21/1/2019(सोमवार)’ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

या यात्रोत्सवात संपूर्ण बंजारा समाजासह इतर समाजबांधव मोठ्या संख्येने सामील होत असतात.या यात्रोत्सवाला निंबायती तांडा,रामपुरा तांडा,न्हावी तांडा,निंबायती गावातील सर्व सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच विविध पदाधिकारी,गावातील तरुण युवक,तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी आणि पोलिस प्रशासन’ यांचे सहकार्य असणार आहे.
*तरी,या यात्रोत्सवात परिसरामधील सर्व ‘व्यापारी- हॉटेल मालक,भांडी दुकानदार,खेळणी आणि मिठाई दुकानदार’ यांनी आपली दुकाने निःशुल्क लावावीत असे आवाहन मोतिमाता मंदिर भक्तगण,निंबायती तांडा,न्हावी तांडा,रामपुरा तांडा,निंबायती गावातील सार्व ग्रामस्थ बंधु/भगिनी यांनी केले आहे.
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

दि.21’जानेवारी-2019 रोजी मांंडवेदिगर येथे मोतिमाता देवीचा यात्रोत्सव

गारखेडा,ता.जामनेर येथून जवळच असलेल्या ‘मांडवेदिगर,ता.भुसावळ’ येथे ‘बंजारा समाजाची कुलस्वामिनी-मोतिमाता देवी’ चे जागृत देवस्थान असुन या देवीचा यात्रोत्सव “मोतिमाता मंदिर ट्रस्ट,मांडवेदिगर” तर्फे ‘दि.21/1/2019(सोमवार) आणि दि.22/1/2019(मंगळवार)’ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

मोतिमाता देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून देखील प्रसिद्ध आहे.या यात्रोत्सवात संपूर्ण खांदेशसह राज्यातील बंजारा समाजासह इतर समाजबांधव मोठ्या संख्येने सामील होत असतात.या यात्रोत्सवाला ‘राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे प्रदेशाध्यक्ष तथा जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-मा.अशोकराव चव्हाण आणि त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच,पोलिस पाटील-मा.रविंद्र पवार,येथील ग्रामपंचायत चे सरपंच,उपसरपंच,सदस्य,चैतन्य साधक परिवार चे साधक बंधू,इच्छापुर्ती हनुमान मंदिर ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी,गावातील तरुण युवक,तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी आणि पोलिस प्रशासन’ यांचे सहकार्य असणार आहे.
*तरी,या यात्रोत्सवात मोतिमाता देवी मंदिर परिसरामधे,जामनेर-भुसावळ तालुक्यातील सर्व ‘व्यापारी- हॉटेल मालक,भांडी दुकानदार,खेळणी आणि मिठाई दुकानदार’ यांनी आपली दुकाने लावावीत असे आवाहन मोतिमाता मंदिर ट्रस्ट,मांडवेदिगर चे अध्यक्ष-सरीचंद पवार,उपाध्यक्ष-धनराज पवार,खजिनदार-चरणदास पवार,सहसचिव-सौ.संत्रीबाई पवार,विश्वस्त-गोविंद पवार,हरि पवार,घनश्याम पवार,अरुण राठोड,श्रीमती.पारशीबाई पवार,यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.यात्रोत्सावाच्या अधिक माहितीसाठी कृपया 9689363261/8408996363/9022234565. या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.