रामटेक (प्रतिनिधी) – येथील पक्षीमित्र तथा
साहित्यिक सचिन चव्हाण यांना डी.रामी रेड्डी
मेमोरियल संस्था मनसर तर्फे पंधराव्या
वर्धापनादिनी सोहळ्यात साहित्य क्षेत्रात विशेष
कामगिरीबद्दल पुरसकाराने सन्मानित करण्याल
आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार
आनंदराव देशमुख, संत गोपालदास महाराज,
वासुदेव शहा टेकात्र, त्रिलोक महेर (अध्यक्ष,
पत्रकार संघ रामटेक), सदानंद निमकर महेश
ब्रम्हनोटे, लक्ष्मण उमाळे, कैलास नरुले, अरुण
बन्सोडे, आदींच्या प्रमुख उपसिथतीत प्रदान
करण्यात आले. स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ असे
पुरसकाराचे स्वरुप होते. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र
कौतूक होत आहे.