सत्य,समतेचे प्रेषित क्रांतिकारी सतगरू सेवालाल -निलेश राठोड

Sant Sevalala Maharaj

*“सत्य व समतेचे प्रेषित सतगरु सेवालाल माराज”*

भारतातील गोर-बंजारा समाजाचे व इतरांचे (गोर-कोर) आराध्यदैवत संत श्री सेवालाल महाराज यांनी विश्वबंधूत्व, सर्वधर्मसमभाव व सत्याची शिकवण दिली म्हणून त्याना सतगरू सेवालाल म्हणूनही ओळखले जाते. अशा या थोर महापुरूषाची जयंती गुरूवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी शासकीय पध्दतीने साजरी करण्याबाबत समाजबांधवाच्या वतीने अनेक वर्षापासून मागणी होती. सदर मागणीला आपल्या महाराष्ट्र सरकारने मान्यता देवून तसे परिपत्रक दिनांक 29 डिसेंबर, 2017 रोजी निर्गमित केलेले आहे. या ही वर्षी दि.२६ डिसेंबर,२०१९ रोजी शासनाने मान्यता दिली,महाराष्ट्रातील सव्वा कोटी व भारतातील जवळपास पंधरा कोटी गोर (बंजारा) बांधवांमध्ये त्यामुळे आनंद व्यक्त होत आहे.
भारत ही संताची भूमी म्हणून ओळखली जाते.भारतात अनेक संत-महात्मे होवून गेलीत.त्यापैकीच एक थोर मानवतावादी संत म्हणजे ‘संत श्री सेवालाल महाराज’ होय, आजीवन ब्रह्मचारी राहुन दीन दुःखीतांच्या सेवेसाठी व सर्व प्राणीमात्राच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. देशभर दौरा केला. मध्यप्रदेशातील जिल्हा बुर्हाणपूर, ग्राम गम्भीरपूरा येथे महाराजांची मोठी यात्रा भरवली जाते.येथिल आदिवासी समुदाय महाराजांना “शिवबाबा” म्हणून संबोधतात.बुलढाणा जिल्ह्यातील सायाळा सिदखेडराजा व गराशागड मेहकर येथेही रामनवमीनिमित् व जयंतीनिमित्त विशेष म्हणजे तिथे सर्व समाजाचे लाखो भाविक जमा होतात. देशातील अनेक प्रदेशात आजही महाराजांचे हजारों श्रद्धास्थाणे उभारल्या गेली आहेत. प्रत्येकाने राष्ट्रभक्ती जोपासावी, अनेक बाबतीत महाराजांची भविष्यवाणी आजच्या तंत्रज्ञान युगात तंतोतंत सत्य ठरत आहे.ब्रिटिश व पोर्तुगिजाविरोधात (काफ़र आन फ़िरगी) ते लढ्ल्याचे,दिल्लीत बादशाह व गुलाबखान,हैद्राबादेत निजामाविरुद्ध,खानदेशात भिल विरुद्ध महाराजांनी बंड देखिल पुकारला होता.भूमाफिया व सरंजामशाही विरुद्ध आवाज उठवत न्याय मिळवून दिल्याचे पुरावे आजही उपलब्ध आहे.सतगरू सेवालाल महाराज भविष्यांत होणा-या गोष्टींचे भाकीत करणारे, जुलमी राजवटी विरूध्द बंड पुकारणारे, गुलामी झुगारणारे, नायकी करणारे , वेळ प्रसंगी अन्यायाविरूध्द बंड पुकारून अस्तित्वासाठी संघर्ष करणारे असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. ते खरे अर्थाने सर्वसामान्यासांठी लढणारे, महान असे योध्दा होते. निजामांची व इंग्रजांनी लावलेल्या कराविरूध्द त्यांनी संघर्ष केलेला आहे. जिजिया कर लावू नका अन्यथा बंड करू असे ते म्हणायचे,वेळप्रसंगी हातात तलवार घेऊन अन्यायाविरूध्द लढा लढल्याचे पुरावे देखील ईतिहासात आढळुन आलेले आहेत. त्यांनी आदर्श तांडा संस्कृती निर्माण केली व अंधश्रध्देपासून समाजाला परावृत्त करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आतोनात प्रयत्न केले.एक महान पराक्रमी, समृद्ध व्यापारी,एक तत्ववेत्ता, एक समाजसुधारक म्हणून संत श्री सेवालाल महाराज यांची देशभर ख्याती आहे.
सतगरू सेवालाल हे आद्य समाजसुधारक व क्रांतिकारक होते हे पुढील बाबीतून आपल्याला दिसेल.

• संपुर्ण जगभरातील गोर बंजारा समाजाचे व बहुजनांचे ( गोर कोर ) श्रध्दास्थान व आराध्यदैवत.

• संत श्री सेवालाल महाराज यांना गोर बंजारा समाजामध्ये सतगरू (सत्यमार्ग दर्शविणारा) असे संबोधतात.

• सतगरु सेवालाल महाराज हे आद्यसंत, आद्यगुरु, महानयोध्दा, क्रांतीकारक, समाजसुधारक, देशभक्त व मानवधर्म माननारे होते.

• सतगरू सेवालाल यांचा जन्म 15 फेब्रुवारी, 1739 गोलाल डोडी , ता. गुत्त्ती जि.अनंतपूर ( आंध्रप्रदेश ) येथे झाला.तर काहिंच्या मते सुरागोंडनकोप्पा ता.न्यामती जि.देवानगरी (कर्नाटक) येथे झाला.

• जन्मापासून ते मरेपर्यत त्यांनी संपुर्ण गोर बंजारा व बहुजनाला ( गोर कोर ) सत्यमार्ग, अहिंसा, अस्‍तेय, अपरिहार्य, करूणा या पंचमार्गाचा ( पाचपारा ) त्यांनी अवलंब केला.

• सतगरू सेवालाल यांना गोर कोर सतगरू (भाया) मानत, “गोर कोर मन भाया कछ, केती करु वाया”
( सतगरु सेवालाल म्हणायचे की मला सर्व समाज भाया अर्थात भाऊ मानतो तर मी कोणाशी लग्न करु कारण सर्व माझे बांधव आहेत.) ते सर्व धर्म समभाव, विश्वबंधुत्व व विश्वकुटूंबांची संकल्पना मानणारे होते.

• स्वावलंबाने व स्वसरंक्षणाचे धडे देण्यासाठी कवायती फौजीच्या धर्तीवर स्वता:ची फौज निर्माण केली.
• अन्याय व अत्याचाराच्या विरोधात लढतांना गुलाब खान, दिल्ली व निजाम शहा, हैद्राबाद यांच्या पाशवी जाचक व कठोर शासनापासून जनतेला मुक्त केले.

• नॉस्टेडॅमस यांच्या सारखे सतगरू सेवालाल यांनीही भविष्यवाणी केली . भविष्याचा वेध घेऊन केलेली भविष्यवाणी आजही खरी ठरली आहे. उदा. जाणजो, छाणजो पछच माणजो (पहिले पहा, तपासा व नंतरच बुध्दीच्या कसोटीवर पटत असल्यासच माना )

• मलकेर वात पलकेम करीय ( स्वदेशातील व्यक्ती विदेशातील व्यक्तीला बोलेल, जसे की आज एका देशातून दुस-या देशातील व्यक्तींना सहज बोलतो येते कारण म्हणजे आजची दुरसंचार पध्दती उदा. दुरध्वनी , भ्रमणध्वनी ई.)

• रपीया कटोरो पाणी वक जाय , बळदेर सिंग सोनेर वेजाय, रपीया तेर चणा वक जाय (एक रूपयाला पाणी विकला जाईल उदा. बिसलरी, बैलाच्या सिंगाला सोन्याचे भाव मिळेल उदा. पशू प्राण्यांची आजची वाढती किंमत, रूपयाला तेरा चणे विकले जातील उदा. महागाई )

• मायेन बेटा परको वीय, लंडीरो राज आय (आईला मुलगा परका ठरेल उदा. आज आई वडीलांची सेवा करणारी माणसे खुप झाली असल्याने आई-वडीलांना वृध्दाश्रमाचा आश्रय घ्यावा लागतो, लबाड व खोटे बोलणा-या व्यक्ती सुखाने जगतील )

• कसाबेन गावडी मत वेचो व हालालेर मासं मत खाव (“ गो ” म्हणजे गाय “ र ” म्हणजे रक्षण करणारा गोर बंजारा समाज हा गाईला अनन्य साधारण महत्व देतो, तथापि तीचे पुजन करतो, मुलत: हा समाज गो-पालन करणारा आहे. गाईचे महत्व त्याकाळी सतगरू सेवालाल यांनी सांगताना त्यांच्याकडे 3755 एवढया संख्येने काफीला होता. म्हणून त्यांनी कसायाला गाई विकू नये व कसायाचा हातचे कोणतेही मासं खाऊ नये कारण सर्वात प्रिय गाईला कापणा-या कसायाच्या कोणत्याही प्रकारचे महत्व त्यांनी दिले नव्हते )

• सत कर पत कर जागेर जत कर लंडी बुची पार कर गोरे माई गोर कर , सिकच सिकावच सिके राज घडावच ( सत्य कर्म कर व सत्याच्या मार्गाने जा, सत्यामुळे समाजात पत अर्थात त्या व्यक्तीला सन्मान प्राप्त होतो, जेव्हाचे काम तेंव्हाच करा, खोटे बोलू नका खोटया मार्गाचा अवलंब करू नका, तुम्ही गोर (संशोधन व विचार) आहात त्यामुळे समाजात सर्वमान्य असे विचार आत्मसात करा, जगात कोणत्याही समाजाचा सर्वांगिण विकास शिक्षणाशिवाय होवू शकत नाही. शिकणारी व्यक्ती आदर्श पिढी व राज्य निर्माण करू शकते)

अशा या थोर व्यक्तीने भारतातील आजचे कर्नाटक,आंध्र,तेलंगाना,मध्यप्रदेश ,गुजरात ,राजस्थान ,छत्तीसगड,झारखंड,पंजाब,दिल्ली,बंगाल आदी राज्यांत जाऊन जाणीव जागृतीचे काम करता करता शेवटी रूईगड ता दिग्रस जि यवतमाळ येथे पंचतत्वात विलीन झाले,त्यांची शेवटची ईच्छा पोरीयागड ता मानोरा जि वाशिम (पोहरादेवी) येथे चिरनिद्रा घेणे हे होते महाराष्ट्रात वाशीम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी ता.मानोरा येथे त्यांची पावन समाधी आहे.येथे दरवर्षी रामनवमीला देशभरातून लाखो भाविक संत श्री सेवालाल महाराजाच्या दर्शनाला येतात.महाराजांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने 2018 या वर्षांपासून 15 फेब्रुवारी ही जयंती शासकीय स्तरावर साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.या निमित्ताने महाराजाचे कार्य व शिकवण सदैव आपणास प्रेरीत करून व स्मरणात राहील.

Nilesh Prabhu Rathod

निलेश प्रभु राठोड
मा.राज्यमंत्री (महसूल) यांचे स्वीय सहायक
09892333233
osd2minister@gmail.com