सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाज वंचित बहुजन आघाडीच्या सोबत असल्याचा निर्णय झाला.

०४/०७/२०१९…….आज महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या सर्वच सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या सोबत जाऊन येत्या निवडणुकीत सत्तेत सहभागी होऊन सामाजिक न्याय याच हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच बरोबर सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय प्रतिनिधित्व प्रबळता समाजाची निर्माण व्हावे हाच निर्णय एकमताने झाला आहे. तत्त्पुर्वी सर्व संघटनांनी समाजाच्या वेगवेगळ्या विषयांवर आपापसात साधक बादक चर्चा झाली आणि नंतर आदरणीय अॅड. बाळासाहेब आंबेडकर साहेब Adv. Balasaheb Ambedkar यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली या वेळी बंजारा समाजाचे अतिमहत्त्वाच्या प्रश्नाबाबत मुद्दे उपस्थित झाले व ते सर्व सहमतीने एकमताने मंजूर करून पुढील वाटचाल ही बंजारा समाज वंचित बहुजन आघाडीच्या सोबत असणार हे शिक्का मोर्तब झाले.
बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी देखील आरक्षणाच्या मुद्द्यापासून ते अगदी सहज मिळू शकेल अशा प्रलंबित प्रश्नांवर तोडगा कसा काढावा या संदर्भात प्रोसेस आऊटसोर्सिंग सांगितले व बंजारा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपणही तेवढ्याच शक्तीने वंचित बहुजन आघाडी सोबत जोमाने कामाला सुरुवात करावे असे आवाहन ही सर्व संघटनांना केले व सर्व संघटनाचे मनपूर्वक स्वागत केले आणि सर्वांचे अभिनंदन देखील केले.
या बैकीकीचे समाजात नक्कीच एक आशा निर्माण होईल व आपणही समाजाला या गोष्टी समाजाला पटवून देण्यासाठी महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तिसरा पर्याय उभा रहावा व महाराष्ट्रातील वंचित समाजाला न्याय देण्याचे काम करायचे आहे.

Adv Balasaheb Ambedkar BBKD

हाच आपला मुख्य ध्येय आणि उद्देश असले पाहिजे आणि आपण मानवतेसाठी एक मुठ बांधुन सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय प्रतिनिधित्व मिळवून घेण्यासाठी एकत्र येऊया.
*महाराष्ट्र राज्य बंजारा वंचित बहुजन आघाडी समन्वय समिती* च्या वतीने *सुभाष तंवर यांची समन्वयक महाराष्ट्र राज्य बंजारा वंचित बहुजन आघाडी.* म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
समितीने घेतलेले निर्णय सर्व मान्य असेल.
*उपस्थित मान्यवर*

*१. राजपाल राठोड औरंगाबाद अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आॅल इंडिया बंजारा सेवा संघ.*
*२. संदेश चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष गोर सेना.*
*३. अंबरसिंग चव्हाण महासचिव भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था.*
*४. सुभाष तंवर समन्वयक महाराष्ट्र राज्य बंजारा वंचित बहुजन आघाडी.*
*५. मोरसिंग भाई राठोड BBKD राष्ट्रीय अध्यक्ष.*
*६. आत्माराम जाधव राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा टायगर्स.*
*७. कातीलाल नाईक राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय बंजारा सेना.*
*८. उल्हास राठोड सत्य शोधक ओबीसी परिषद.*
*९.अविनाश चव्हाण जालना.*
*१०. प्रा. पी. टी. चव्हाण महासचिव राष्ट्रीय बंजारा परिषद.*
*११. चुनिलाल जाधव अध्यक्ष बंजारा भटके विमुक्त आदिवासी संघटना.*
*१२. नंदुभाऊ पवार प्रदेश अध्यक्ष BBKD*
*१३. हिरासिंग राठोड*
*१४. संजय चव्हाण*
*१५. अनिल पवार*

*उपस्थित बंजारा समाजाच्या सर्व संघटानांचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन व आभार.*

Tag : Bahujan Vanchit Aaghadi, Adv Balasaheb Ambedkar, Bharatiya Bahujan Kranti Dal, Banjara Kranti Dal, Morsing Rathod