हिंगोली लोकसभा मतदार संघातील हटकर-धनगर बांधवानी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहन राठोड (चाबी ) यांनाच मतदान करावे

श्री. सतिष एस राठोड ✍

  • हिंगोली:- हिंगोली लोकसभा मतदारसंघ मतदान दि.१८ एप्रिल २०१९ रोजी होणार आहे .भारतीय संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी सरकार पराभूत करणे काळाजी गरज झाली आहे.

महाराष्ट्रातील धनगर समाजाला एस.टी.आरक्षणाची अंमलबजावणी करून शिक्षण ,नौकरी व राजकीय आरक्षण लागू करण्याचा शब्द भारतीय जनता पार्टी-शिवसेनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिला होता. परंतु ५ वर्ष सत्ता भोगल्यानंतर सुध्दा धनगर समाजाची आठवण शिवसेना-भारतीय जनता पार्टीला आली नाही .
धनगर समाजाच्या आरक्षणा बदल काँग्रेस-राष्ट्रवादी पार्टीने विरोधी पक्ष म्हणून लोकसभा किंवा राज्यसभेत कधीही आवाज उठविला नाही .

  • महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या एस.टी.आरक्षणा सोबतच लोकसभा आणि विधानसभेत धनगर समाजाला राजकीय प्रतिनिधित्व /हक्क मिळावे म्हणून शिवसेना-भारतीय जनता पार्टी तथा काँग्रेस-राष्ट्रवादी पार्टीने धोरण घेतले नाही.सत्ताधारी व प्रस्थापित चारही पक्षानी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४८ मतदारसंघा पैकी एकही उमेदवारी धनगर समाज बांधवांना दिली नाही.

परंतु महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या तरूणांनी २० मे २०१८ रोजी पंढरपूर येथे धनगर समाजाचा लाखोंचा मेळावा घेऊन माजी खा.ॲड .बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली . मा.ॲड .बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शब्दा प्रमाणे ४८ जागापैकी ६ उमेदवारी धनगर समाजाच्या श्री .गोपीचंद पडळकर (सांगली ), ॲड .विजयराव मोरे (माढा ), नवनाथ पडळकर (बारामती ), प्रा.यशपाल भिंगे (नांदेड ), अर्जुन सलगर (उस्मानाबाद ), श्री .पुजारी (ठाणे ) या नेत्यांना दिली.
आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाचे ६ खासदार करून दिल्लीच्या संसदेत पाठविणारा एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी होय.

  • हिंगोली लोकसभा मतदारसंघात हटकर-धनगर समाजाचे ३.५० लाख मतदान आहे .यापूर्वी स्व.ॲड .माधवराव नाईक हे भारिप-बमसं कडून १९९८-१९९९ साली च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होते.

२०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीने बंजारा समाजाचे नेते श्री .मोहन राठोड यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या पाठीमागे बंजारा -बौध्द समाज भक्कमपणे उभा आहे .आमच्या हटकर-धनगर समाज बांधवानी त्यांना साथ दिली की, श्री .मोहन राठोड हे प्रचंड मतानी विजयी होऊन दिल्लीत जाणार .
शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी पार्टीचे सुभाष वानखेडे यांनी एकदाही हटकर-धनगर समाजाच्या एस.टी.आरक्षणा बदल भूमिका घेतली नाही. तसेच विधानसभा ,जि.प.,पं.स.,नगरपरिषद निवडणुकीत हटकर-धनगर समाजाला राजकीय प्रतिनिधित्व /हक्क मिळावा म्हणून स्वतःच्या पक्षात आवाज उठविला नाही.

  • म्हणून हिंगोली लोकसभा मतदारसंघतील माझ्या हटकर-धनगर समाज बांधवाना नम्र विनंती आहे की, शिवसेनेचे हेमंत पाटील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी पार्टीचे सुभाष वानखेडे यांना पराभुत करून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार श्री.मोहन राठोड यांच्या ” चाबी ” निशाणीचे बटन दाबून प्रचंड मतानी विजयी करावे असे आवाहन हटकर-धनगर समाजाच्या नेत्यांनी केले आहे.