​प्रा.दिनेश सेवा राठोड राष्ट्ररत्न आवार्ड 2017  पुरस्काराने सन्मानित

पुणे दि..31अॉक्टो.17

    नेहरू युवा केंद्र, क्रिडा व युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकार व  पद्मश्री डॉ.मनीभाई देसाई  मानवसेवा ट्रस्ट पुणे यांचे संयुक्त विद्दमाने त्यांना   भारत रत्न सलादार वल्लभभाई पटेल  राष्ट्ररत्न अवार्ड 2017 या राष्ट्रस्तरीय पुरस्काराने डॉ.रवींद्र भोळे , डॉ .यशवंत मानखेडकर  यांच्या हस्ते सावित्रीबई फुले सांस्कृतिक भवनमध्ये भव्य सोहळ्यात त्यांच्या  शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी प्रतिष्ठेचा हा पुरस्कार राष्ट्रीय एकात्मता दिनी 

 त्यांना देऊन  गौरवान्वित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी खासदार  अमर साबळे हे होते. देशातील सामाजिक ,सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करणाऱ्या व्यक्तीकडून व त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशाभरातुन आलेल्या प्रस्तावामधून प्रा.राठोड यांची भरीव कार्यामुळे अग्रक्रमाने निवड करण्यात आली.  

  माझ्या माहिती प्रमाणे, आतापर्यंत दिनेश सरांच्या  अनेक वर्षांच्या अनुभवातून सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण व शैक्षणिक  संशोधनावर अनेक  शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेले व  प्रसिद्ध झालेले आहेत. विषय तज्ज्ञ आहेत त्यांना यापुर्वी राष्ट्रीय बंजारा समाजभूषण पुरस्कार , शासनाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पारितोषिक, शेवनेरी गौरव,आशा अनेक  पुरस्काराने ते सन्मानित आहेत.  ते गोर बंजारा समाजाचे विविध पैलू हाताळनारे   लेखक/कवी सुद्धा आहेत. अॉल इंडिया बंजारा सेवा संघ, व.ना.बं.परिवर्तन चळवळीच्या माध्यमातून बहुविध शैक्षणिक व  सामाजिक कार्यामध्ये सदैव कार्यरत असतात.

   त्यांची अशीच प्रगती व्होवो अधिकाधिक समाज सेवा त्यांच्या हातुन घडो  त्यांचे 

अभिनंदन.अभिनंदन

​प्रा.दिनेश सेवा राठोड