अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलन , मुंबई
नागपूर विभागीय दौरा
दि . 03 – 09 – 2017 ला नागपूर येथे जागृती अभियान द्वारा आयोजित कार्यक्रमात मुंबई येथे होणाऱ्या अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलनाबाबत सर्व बांधवांनी सहकार्य करावे . फक्त निधी घेणे वा देणे हेच सहकार्य नसून साहित्य व समाज घडविन्यात आपण प्रचंड शक्तीने पुढाकार घ्यावा . असे आवाहन ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री राजू नाईक साहेब यांनी केले .
सदर कार्यक्रमात IIT गुरूकुल चे संचालक मा प्रविण पवार यांची ऑल ई बं सेवा संघ , महाराष्ट्र प्रदेश युवाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली . याप्रसंगी , समाजात स्वाभिमान जागृती करणारे साहित्य व नवतरुण कार्यकर्त्याची फळी निर्माण करणे गरजेचे आहे . तसेच समाजाशी होणारे विविध धोके व धोकेबाज यांना यापुढे माफ करून चालणार नाही . असे मत नव युवाध्यक्ष प्रविण पवार यांनी मांडले .
मुंबई येथे होणारे संमेलन हे साहित्य चळवळीला तसेच गोरबंजारा समाजाला गौरवान्वित करणारे असेल याकरिता आपले सर्वांचे सहकार्य हवे . असे आवाहन संयोजक मा सुखी चव्हाण यांनी केले .
कार्यक्रमाला मंचावर विराजमान मा राजूसिंग नाईक साहेब , मा प्रविण पवार , मा सुखी चव्हाण , मा सुनील राठोड , मा प्रा दिनेश राठोड , मा रामधन राठोड नायक , मा बी एस राठोड , मा बद्रीप्रसाद चव्हाण , मा दिलीप राठोड , मा आरजूनिया भुकिया आदी मान्यवारांची उपस्थिती लाभली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अशोक पवार व संचालन श्री होमसिंग पवार यांनी केले आयोजनात विशेषतः श्री हरीश चव्हाण , श्री नीरज राठोड , श्री अशोक पवार , श्री होमसिंग पवार , श्री रविंद्र चव्हाण घाटंजी , सुदाम राठोड विजय जाधव निखिल पवार , विनोद राठोड , सुशील पवार , युवराज चव्हाण व मित्र मंडळीचे सहकार्य योगदान मिळाले .
धन्यवाद…..
माता,सुखीभाऊ चव्हाण
बदलापुर मुंबई महाराष्ट्र राज्य
सौजन्य-: गोर कैलास डी राठोड