“अखिल भारतीय बंजारा समाज साहित्य सम्मेलन-केवळ गोर संस्कार व गोर साहित्यानेच व्हावे”

​*भाग -2*

*बंजारा साहित्य संमेलन- काही तथ्ये व अपेक्षा*

   ✍प्रा.दिनेश एस.राठोड  

   आपण जाणतो साहित्यच माणसाला सुसंस्कृत बनविते. .संस्कृतीचे संक्रमन करते.  आमच्या उमेदी  साहित्यिकांनी गोर विचारांच्या साहित्य चळवळीला प्रतिष्ठा देण्याची खरी गरज आहे. समाज सर्वार्थाने पुढे न्यायचा असेल, तर गोर बोलीतील  साहित्यिकांचीही तेवढीच नितांत गरज आहे.

  अलिकडे गुराखी   साहित्य संमेलन जंगलात यशस्वीपणे पार पडले. आमचे बंजारा साहित्यिक मित्र हे त्या ठीकाणी हजर होते.आमच्या  अस्सल गोर साहित्याचा संमेललन करवी समाजास निश्चितपणे उपयोग व्हावा, वाशिम येथे झालेल्या साहित्य संमेलनास पहिले संमेलन समजण्यात येते.या संमेलनात ठरविण्यात आलेल्या  सर्वसमावेशक बाबी कितपत सार्थ ठरल्या यावर सुध्दा चिंतन व्हावे.

परंतु याआधी सुध्दा आपली संमेलने छोट्या  स्वरुपातही पार पडलेली आहेत.आपल्या  समाजातही साहित्याची मोठी परंपरा आहे. बंजारा ओव्यांच्या मौखिक परंपरेपासून ते आज लेखन करणा-या अनेक नवोदित लेखकांपर्यंत ही साहित्य निर्मितीची परंपरा अखंडितपणे सुरू आहे ते  स्वाभाविक प्रशंसेस पात्र आहे.

संमेलनआधी समाजाच्या साहित्याची नेमकी व्याप्ती ठरविणे, या साहित्याची सुरूवात, , तिचे स्वरूप फलनिष्पत्ती , व भविष्यवेध काय होते  व काय असावे  समाजातील संपूर्ण देशातील साहित्यिक कोण आहेत, या अनुषंगाने या साहित्य संमेलनात चर्चा व मांडणी देशपातळीवर झाल्यासच संमेलन अखील भारतीय ठरेल व देशपातळीवरील सास्कृतिक विचार समकालीन विचारांची पर्वनी व्हावी.  साहित्य संमेलनातून भविष्यकालीन साहित्य निर्मितीची दिशाही ठरवली जावी, आहे. समाज परंपरा व लोककलांचेही यात सादरीकरण असावे , केवळ भाषनबाजी नव्हे ! या साहित्य संमेलनस्थळाचे संत सेवालाल  साहित्यनगरी असे नामकरणाची अपेक्षा आहे, उर्वरित स्थळांना वसंतरावजी नाईक व समाजातील समाज सेवक व दिवंगत साहीत्यकांचे नाव असावे. संमेलनात सध्य- समाजाच्या प्रश्नावर व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे यांचे आयोजन व्हावे.  आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महासरस्वतीचा कुळाचार सांभाळत आहे. तिथे जातिभेद-पक्षभेद-पंथभेद विसरून संपूर्ण मराठी समाज एकोप्याने सामील होत आहे आम्हीला सुद्धा याचा विचार करावा लागेल . परंपरा नष्ट करणे सोपे; परंपरा शुद्ध करणे कठीण!आज अशीच स्थिती आहे.

   आजचे आपले साहित्य संमेलन हे केवळसाहित्यिकाचे

संमेलन नसावे,तर  मराठी संमेलनाप्रमाणे आम्हा समाजाचा साहित्योत्सव, लोकोत्सव संस्कृती महोत्सव व्हावा, व  गोर  साहित्य संमेलन  गोरसंस्कृती  महोत्सव व्हावा.हा वाड्मयीन उत्सव वा संस्कृती महोत्सव मानल्यास संमेलनाच्या  अध्यक्षपदावर केवळ साहित्यिकांचाच नव्हे, समाजातील इतर विचारवंत, संशोधक, पत्रकार, प्रकाशक, समाजसेवक यांचाहीअधिकार भविष्यात  अपेक्षित असेल

  अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलनाचे भवितव्य काय? आज गोर बंजारा भाषा मरणपंथाला लागली असल्याची कुणकुण आहे तीचे संवर्धनही  महत्त्वाचे आहे

    गोरविचार,संस्कारच्या अनुशंगाने  व गोराधर्म तत्वाला आभिप्रेत असलेले व त्या निकषाने साहित्यातील मर्मदृष्टिला स्पर्श झालेला विचारच  समाजास चिरकाल टिकवेल याचाही उहापोह या निमित्ताने असावा, साहित्य संमेलन समन्वयवादी, उदारमतवादी व हे सर्वमान्य, समाजमान्य भूमिकेतूनच निर्माण व्हावे असे वाटते,संमेलनात ज्येष्ठ विचारवंत/ ज्येष्ठ साहित्यिक/ उत्तम वक्ता यांचेही दीर्घ व्याख्यान असावे, संमेलनातमहाविद्यालयीन व विद्यालयीन छात्रांना उत्तेजन मिळेल, असे त्यांचे समाज विषया वरील प्रश्नांवर  कथाकथन, काव्यवाचन असे कार्यक्रम हवे 

*क्रमशः भाग 3 मध्ये*

गोर कैलास डी राठोड