“अखिल भारतीय बंजारा समाज साहित्य सम्मेलन-केवळ गोर संस्कार व गोर साहित्यानेच परिपूर्ण व्हावे”

​*भाग 3*

*बंजारा साहित्य संमेलन- काही तथ्ये व अपेक्षा*

    प्रा.दिनेश एस.राठोड 

   समाज विषया वरील प्रश्नांवर  कथाकथन, नाट्य, काव्यवाचन असे कार्यक्रम हवे विनोदी वक्तृत्व स्पर्धा, बंजारा भजन लेंगीगीत काव्यगायन मैफल, काव्याधारित नृत्य, समाज निगडीत  संशोधन शोधनिबंधाचे वाचन असे नव-नवे कार्यक्रम आयोजित व्हावे. संशोधक,समाजात लौकिक यश मिळविलेली व्यक्ती, चित्रकार, मुद्रक, ग्रंथविक्रेते इत्यादी व्यक्तींचे प्रातिनिधिक सत्कार व्हावेत.

  आज संगणक व तत्सम आधुनिक उपकरणे वापरून जे आमचे साहित्य व्यवहार करीत आहेत. त्यांचेही साह्य परोपरीने संमेलनाने घ्यावे.

संमेलनाचा सर्व आर्थिक व्यवहार समाजासमोर स्पष्टपणे सादर व्हावा.

संमेलनात महाराष्ट्राबाहेरील बंजारा  समाजास वा साहित्य कास  विशेष प्रतिनिधित्व मिळावे  संमेलन अध्यक्ष निवडी संबंधीची सर्व माहिती व सर्व तपशील सातत्याने प्रसारमाध्यमांद्वारे समाजापर्यंत पोहोचनेही अपेक्षित आहे,बंजारा गोरबोलीतुन लेखन करित गोरबोली व गोर संस्काराचा समाजात व्यावहारिक उपयोजन करनारा व त्याचा उदो उदो करनारा अस्सल गोर साहित्यिकच संमेलन अध्यक्षाचा विचार प्राधान्याने व्हावा जसे यावेळी संमेलन अध्यक्ष म्हणून  समाजातील जेष्ट साहित्यिक भिमणीपुत्र मा.मोहन नाईक यांचे नाव समोर असल्यास ही बाब समाजास सुखद असेल.ते सर्वमान्य असल्याचा सध्या चा सुर आहे.असे माझे वैयक्तिक मत आहे. याशिवाय इतर अनेक विविध वास्तववादी परीने संमेलनात शुद्धता आणि नवीनता आणता येईल.

साहित्य संमेलन दर दोन तीन वर्षांनी झाल्यास संमेलन यशस्वी  होईल.एका वर्षातच एवढे साहित्य तयार होणार नाही.

 उपरोक्त लेखातील मत हे माझे वैयक्तिक स्वरुपाचे आहेत.नागपूर मिंटिंगला वेळोवेळी उपस्थित राहने शक्य नाही लेखातील बाबींच्या  अपेक्षेसह  काही चुकीचे असल्यास समजुन घ्यावे.

*सौजन्य–*

*वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ*

9404372756

  *समाप्त*
गोर कैलास डी राठोड