काही राहून गेलेल्या दिपावली शुभेच्छा…..
बाहेर दिवाळीची धामधून सुरु असताना वेटिंग रुममध्ये बसुन, ICU मध्ये आपल्या पेशंट ची काळजी करणारया बंधू बघिनिन्ना शुभेच्छा
फटाक्यांच्या दुकानातली गर्दी पाहूनही जे बाळगोपाळ आपल्या बाबांच्या बजेटमुळे मनसोक्त खरेदी करु शकत नाहीत त्यांना भरपूर फटाके खरेदी करता यावेत ही शुभेच्छा…
शेजारणीचा भरगच्च दिवाळी फराळ नुसता पाहून घरी परत आलेल्या गरीब गृहिणीला मनासारख्या लाडू, करंज्या, चिवडा करुन आपल्या कुटुंबाला तृप्त करता यावं ही शुभेच्छा….
काचेमागच्या मिठाईला नुसता डोळ्यांनी स्पर्श करुन सुखावणार्या गरीब डोळ्यांना आता चवीचं सुखही जीभेला मिळावं ही शुभेच्छा….
बायकोला एखादा सोन्याचा दागिना करावा ही अनेकांची अनेक वर्षांची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण व्हावी ही शुभेच्छा…
गेली दोन वर्ष एकही नवा ड्रेस न शिवलेल्यांना यंदा मनासारखा ड्रेस शिवता यावा ही शुभेच्छा….
…या आणि अशा असंख्य मनःपूर्वक शुभेच्छा..
सौजन्य:- गोर कैलास डी. राठोड…ठाणे मुंबई
मो.९८१९९७३४७७