“अत्याचार सहन करण्या पेक्षा मेलेले बरे”

Kailash D. Rathod

अत्याचार सहन करण्या पेक्षा मेलेले बरे!!
समाज एकसंघ करावयाचे असेल तर सर्व

संघटनेच्या लोकांनी सयुक्तिक पणे आपले

विचार विनिमय करून उद्धेश सफल करने

योग्य होईल आपआपसातील वैचारिक मतभेद

दूर करून दृढ विस्वास निर्माण झाला पाहिजे.

दुर्दैवाने लिहावेसे वाटते कि एक दोन संघटना सोडल्याखेरीच कोणीच एकत्र येण्या ची भाष्या  करताना दिसत नाही . याला स्वार्थी

वृत्ती म्हणतात . समाज एकसंघ न करण्याचे

तुमच्या संघटनेच्या घटनेत आहे का ते उघड

करावे म्हणजे  आम्ही ब्र शब्द लिहणार नाही
समाजाच्या प्रत्येक उच्च पदस्य संघटनेच्या

व्यक्तींनी समाजाशी  विश्वासघात करणार नाही, समाजाचे दुःख हे माझे दुःख आहे

समाजाच्या कोणत्याही घटकावर टीका अथवा लांचंन लावणार नाही, समाजातील गोरगरीबाची दलाली करणार नाही

लुबाडणार नाही समाज प्रोबोदन संत सेवालाल बापू च्या शपतेवर करेल,रात्री बेरात्री रुग्ण किंवा काही अडचणी असतील तर धाव घेईल,कुठेही

गोर समाजावर अत्याचार झाला तर कुठलाही न्यूनगंड न बाळगता धाव घेईल

धाव घेण्यास भाग पाडेल.

तुमच्या पाठीशी किती जण

आहेत हे मोजण्यापेक्षा, तुम्ही

किती जणांच्या पाठीशी आहात

ह्याचे आत्मपरीक्षण करून

समाजास  अभि वचन  द्यावे.
आपली वाणी समाजाशी संवाद साधताना

मधुर असली पाहिजे व अत्याचार झाले तर

प्रखर व कठोर झाली पाहिजे.

आपल्या विखारी बोलन्याने कोणी दुखावणार

नाही याची काळजी घेतली पाहिजे .नाते तुटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

नाते सांभाळायचे असेल तर

चुका सांभाळून घेण्याची

मानसिकता असली पाहिजे..आणि

नाते टिकवावयाचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची

सवय नसली पाहिजे.
संबध असे तयार झाले पाहिजे कि कधीही

तुटणार नाही अशी घट्ट मैत्री झाली पाहिजे कि

कोणतीही वेळ आली तर पूर्ण सघटनेतील

मित्र निस्वार्थपणे   एकमेकांना साथ दिली पाहिजे .मित्र प्रेम

हे जीवनाचे मूळ आहे.
सर्व गोरबांधवांना प्रेमाने वागाव त्यांची व्यथा शांत पणे समजून घ्यावे

कारण आज काही लोकांमध्ये गर्व झाला आहे स्वतःचे सामाजिक स्तर उंचावल्याने  इतरांकडे कमीपणाने बघतात पारंपारिक सण असेल जाणून बुजून

भाग घेत  नाही .व इतरांनाही भाग घेऊ देत नाही  अशा विचारांची व्यक्ती समाजद्रोह करतात त्या मूळे संस्कृतीचे मारेकरी यांना म्हणावे लागेल  अशा समाजद्रोही विरुद्ध सामाजिक जाब विचारला पाहिजे.

त्यांना हि समाज प्रबोदन ची आवश्यकता

निर्माण झाली आहे.
समाज रसातळाला चालला तरी आपण मूग

गिळून किती दिवस बसणार. आपलि संवेदन

शक्ती मेली आहे का?बांगड्या भरल्या आहेत का? आपण मेलेल्या आईची दूध प्यायलो आहे का? एकदा तरी जीवनात समाजाशी एकनिस्ट होणार का?कुठे गेले आपले अस्तिव ? भर दिवसा इज्जत लुटली जाते

तरी सुंभा सारखे ,दगडा सारखे कुठलीही प्रतिकार न करता शांत राहतात एवढे निष्क्रिय आहोत का आपण?असे अनेक प्रशन  पडतात .मन कासावीस होतो असे अत्याचार सहन करण्यापेक्षा मेलेलो बरे
—सुखी चव्हाण,बदलापुर
9930051865

सोजन्य:गोर कैलास डी राठोड

बंजारा आँनलाईन न्युज पोर्टल मुंबई,

website: www.banjaraone.com

मो.9819973477