अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी उपेक्षित वाडीतांडय़ांना दिला

न्याय सलेल्या जिल्ह्यातील 62 वाडीतांडय़ांना आता स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विकासापासून कोसो दूर असलेल्या वाडी तांडय़ात प्राण फुंकत त्यांना महसुली दर्जा मिळवून दिल्याने हे वाडी-तांडे आता विकासाच्या पुरक प्रवाहात येणार आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येत वाडीतांडय़ाना महसुली दर्जा मिळण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ असून अप्पर जिल्हाधिकारी व त्यांच्या हाताखालील महसूल यंत्रणेने केलेली धडपड व प्रयत्नुंळे हे शक्य झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील दुर्ग भागात व दर्या खोर्याच्या ठिकाणी अनेक वाडी-तांडे वस्त्या आहेत. मुख्य ठिकाणापासून लांब असल्याने अनेक वाडी तांडे विकासापासून वंचित राहत आहे. त्या अवस्थेत येथील ग्रामस्थ जीवन जगत आहेत.

अनेक वर्षापासुन उपेक्षित व अत्यंत प्रतिकूल अवस्थेत असणार्या या वाडी तांडय़ांना महसूल दर्जा मिळून दिल्यास या परिस्थितीतून ते बाहेर पडतील हे कित्येक शासकीय उपक्रम यशस्वीपणे राबवणारे अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ओळखले. लगेच त्यांनी सर्व माहिती गोळा करून या कामांचे नियोजन केले. कुठल्याही वाडी-तांडा वा वस्तीला महसुली दर्जा मिळण्यासाठी पाचशे लोकवस्तीची अट आहे. अप्पर जिल्हाधिकारी स्वामी यांनी महसूल यंत्रणेचा प्रभावी वापर करून पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वाडी तांडय़ाचा शोध घेवून त्यांचे प्रस्ताव तयार केले. यानंतर लोकसंख्येची खातरजमा करून घेण्यासाठी तसेच वाडीतांडय़ाचे क्षेत्रफळ व अन्य बाबींची माहिती गोळा करण्यासाठी तहसिलदारांना सांगितले. महसुली दर्जा मिळणार असल्याने तेथील ग्रामस्थांनीही महसुल यंत्रणेला आवश्यक ती मदत केली. याचा परिणाम म्हणून महसुली दर्जा मिळण्यासाठी जवळपास 104 प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले असून यातील 62 वाडी-तांडय़ांना महसुली गावांचा दर्जा मिळाल्यामुळे या गावांचे भविष्यात स्वतंत्र अस्तित्व राहणार आह