“आँल इंडिया बंजारा सेवा संघाच्या वतिने या वर्षीचे अखिल भारतीय साहित्य सम्मेलन मुंबई येथे होणार”

​ऑल इंडिया बं से संघाच्या वतीने यंदाचे अ.भा.गोर बंजारा साहित्य संमेलन मुंबई येथे होणार

______________________

………….. प्रेस नोट………………….

गोर बंजारा गोर गणाची समृद्ध व ऐतिहासिक वाङ्मयीन परंपरा असून गोरबंजारा संस्कृती व गोरबोलीतील मौखिक साहित्य मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  सदर साहित्य संमेलन ऑल इंडिया बंजारा सेवा संघ द्वारा आयोजित  केले जात आहे. ऑ . इ. बं. से. संघचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.राजुसिंग नाईक साहेब व खजिनदार श्री हरीलाल  नाईक साहेब  यांच्या उपस्थितीत आज दि 23 / 04 / 2017 ला मुंबई येथे एक सभा घेवून संमेलनाची अधिकृत घोषणा करण्यात आली. आगामी अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन मुंबई  येथे होणार आहे . मुंबई हे ठिकाण लोहमार्ग हवाइमार्गाकरीता सुविधायुक्त असून साहित्य रसिक व समाज बांधवांना अत्यंत सोइचे आहे . तमाम गोरबंजारा साहित्यिक मंडळीच्या साहित्याला प्रसिद्धी देणारे हे संमेलन व्हावे. करीता सर्व देशभरातील गोर साहित्यिक बांधवांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे. याप्रसंगी आजच्या सभेला श्री सुखलाल चव्हाण,श्री सुनील हजुसिग राठोड, श्री दयाराम आडे , प्रा.दिनेश एस.राठोड व प्रा.रवींद्र बं.राठोड, श्री,शेषमल राठोड, निलेश शिवराम राठोड, प्रा.संतोष एच.राठोड, ग्यानसिंग जाधव ,हरिष गणपतराव चव्हाण अरजूनीया सीतीया भूकीया , पंडीत अमरसिंग राठोड, गोर कैलास  डी .राठोड , अविनास राठोड,डिगाम्बर चव्हाण सह अनेक गोरबांधव उपस्थित होते . याप्रसंगी देशभरातील गोरबंजारा बांधव व साहित्य रसिकांनी या संमेलनास सहकार्य करावे असे आवाहन  ऑ . इ . बं . से. संघचे अध्यक्ष मा राजू नाईक साहेब यांनी केले .

         साहित्य संमे. संयो.समिती

               सुखलाल चव्हाण 

______________________

सौजन्य: गोर कैलास डी राठोड

गोर बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल मुंबई महाराष्ट्र राज्य.

मो.9819973477/8652822469

Website: m.banjaraone.com