आधुनिक भविष्यवेता: संत सेवालाल

भारतात अनेक जाती, जमाती, धर्म पंथाचे लोक राहतात प्रत्येक जाती धर्मातील लोकांना नव विचार देण्यासाठी समाजाला नव संजिवनी देण्यासाठी प्रत्येक जाती, धर्मात महामानवाचा जन्म होतो. भारतीय समाज जीवनाचा अभ्यास केला तर लक्षात येईल की, असे अनेक महामानव आहेत. त्यांनी आपल्याच जाती, धर्माला नव्हे तर संपूर्ण देशाला विचाराची शिदोरी देण्याचे कार्य केले आहे. अशा महामानवात महात्मा ज्योतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, पेरीयार रामा स्वामी, अन्नाभाऊ साठे आदी महामानवाचा उल्लेख करता येईल. ही एक नैसर्गिक खेळी आहे प्रत्येक जाती, धर्माला, राष्ट्राला प्रेरणा देण्यासाठी आदर्श महामानवाची आवश्यकता असतो. प्रत्येक कालखंडात त्या, त्या समाजाला प्रेरणा देण्यासाठी महामानवाची गरज असते ही गरज भरुन काढण्याची किमया नियतीच करीत असते. बंजारा समाज भारतातील प्राचीन समुहातील एक जमात आहे आणि त्या समाजात प्रेरणा देणारे युग पुरुष 15 फेब्रुवारी 1739 मध्ये महान तपस्वी, वैचारिक प्रबोधनका, भविष्यवेता, संत सेवालाल यांचा जन्म झाला. बंजारा समाजात संत सेवालाल यांना ईश्वरी स्थान असले तरी बंजारा समाजाला नवविचार देण्याचे काम संत सेवालाल यांनी केले आहे. ‘तम सोता तमारे जीवनणेमं वजालो कर सकोचो’ से क्रांतिकारी तत्व संत सेवालाल यांनी बंजारा समाजाला दिले आहे. आज आपण पाहतो की, चमचेगिरीचे प्रमाणे फार मोठय़ा प्रमाणात वाढले असून प्रत्येक माणूस दुसर्यावर विसंबून आहे प्रत्येकाला वाटते की कुणी तरी येईल व माझे कल्याण करील परंतु कुणीच कुणाचे कल्याण करु शकत नाही जर आपल्यामध्ये परिवर्तन करावयाचे असेल तर ते अपल्यालाच करावे लागेल दुसर्यावर विसंबून न राहता स्वतःच प्रयत्नशिल असले पाहिजे तरच आपले हित साधले जावू शकते. हा क्रांतिकारी संदेश संत सेवाभाया यांनी दिले आहे.

‘जाळजो, छाळजो अन पचच मानजो’ कोई केती मोठो छेई कोई केती नानक्या छेई’ सेन साई वेस, जीवन जनगानीन साई वेस, किडी मुंगीन, कोर गोरुन साई वेस. धरणीन धन धानेती धपाडेस, बोलजो मत लुची लबाडी भटक जाये लांबी झाडी, करीये चोरी खाये कोरी हातेमायी हातकडी, पगेमायी बेडी डोरी डोरी हिंडीये, गोर गोर गरीबेन दांडण खाये, वोरी सात पीडीन दाग लाग जाये, वंशेपर दिवो कोणी रिअं,वरील सर्व क्रांतिकारी तत्वज्ञान सेवाभायाचे आहे आपण जर शात्रीय दृष्टीकोणातून वरील तत्वाचा अभ्यास केला तर लक्षात येईल की, या सर्व विचारात कुठेच अंधश्रद्धेचा लवलेस दिसून येत नाही. सर्वच विचार सिद्धांतासी निघडीत आहे. पृथ्वीतलावरील सर्व माणसे सारखीच आहे. ऊच, निच, भेदा भेद सर्व मानवाने निर्माण केले आहे यापासून आपण दुर राहिले पाहिजे पृथ्वीतलावरील जीव जंतुच्या खुशालीचा विचार केला पाहिजे. अविचारापासून आपण दुर राहिले पाहिजे. चोरी करु नका, व्यसनापासून दूर रहा, गोर गरीब लोकांच्या हिताचे रक्षण करा अशा महत्वपूर्ण विचाराची मांडणी संत सेवाभाया यांनी केली असून यांच्या विचारांचा प्रसार करण्याची गरज आहे. संत सेवालाल यांचे हे मौलीक विचार बंजारा समाजातील प्रत्येक मानसाने अंगीकारणे आवश्यक आहे. सेवा भायांनी जी 18 व्या शतकात भविष्यवाणी केली होती ती आज तंतोतंत खरी ठरली आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 18 व्या शतकात बंजारा समाज शिक्षणापासून दूर होता, लिखान साहित्य उपलब्ध नव्हते. तरी सेवाभायांचे बोल मोखीक रुपात आज पर्यंत उपलब्ध आहे. लिखान करणारे आप आपल्या परीने लिखान करुन साहित्यात बदल करतात. हे आपणास चांगलेच ठाऊक आहे. कारण स्वतंत्र्य संग्रामात बंजारा समाजाचे फार मोठे योगदान असतांना ही त्यांचा उल्लेख न करता ज्यांनी कवडीचीही कामगिरी केलेली नाही त्यांची इतिहासाच्या पानावर नोंदी आहेत. सेवाभायांनी केलेली भविष्यवाणी मोखीक स्वरुपात पुढे आलेली आहे. म्हणून ती वस्तुनिष्ठ आहे. 18 व्या शतकात सहा, सहा महिने पाऊस पडत होता. त्यावेळेस सेवाभायांनी सांगीतले होते की, रपिया कटोरो पाळी वकीये यावर त्यावेळेस कोणीही विश्वास ठेवला नसता पण आज संत सेवाभायाची भविष्यवाणी खरी ठरलेली आहे.

इ सतयुग छ, येरे बाद कलयुग आये, कलीयुगमं कल्लोळ चालीये, मायेने बेटा भारी विय, रपियार तेर चळां वक जाये, वाना वानर दख आये, घर घर डॉक्टर रिये, डॉक्टरेन दुखळों लाभो कोणी, सोनेर सिंग गवा वक जाये, रपिया लेन गल्ली, गल्ली फरीये, वोन अन्न कोणी मळं, बोलतु बोलतु मनक्या मरजाये, मलकेर खबर पलकेमं कळजाये, भाई भाईरो पट कोणी, सासु, बोडीरो पट कोणी, घरमं काळ धरस जाये.

वरील भविष्यवाणी बाबत आज विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, या सर्वच गोष्टी तंतोतंत खर्या ठरल्या आहेत. या पेक्षा आपल्याला कोणता मोठा पुरावा हवा आहे. भारत भुमिवर जेवढे संत महात्मे होवून गेले. त्या कोणत्याच संत महात्म्यची संत सेवाभाया ऐवढी भविष्यवाणी खरी ठरलेली दिसून येत नाही. तरी बंजारा समाज संत सेवाभायांचे विचार अनुकरण करण्यापेक्षा इतरच भोंदु बाबांच्या मागे लागलेला आहे. जेवढे सेवाभायाच्या विचाराने बंजारा समाजाचे संघटन होईल. बंजारा समाजाची प्रगती होईल ती इतर भोंदू बाबाच्या पाठीमागे लागून होणार नाही. यावर बंजारा समाजाने चिंतन करण्याची गरज आहे. म्हणून शिक्षीत लोकांनी, संघटना, चळवळीमध्ये काम करणार्या लोकांनी 15 फेब्रुवारीपासून पुढे एक महिना संत सेवाभायांचा विचारांचा प्रसार करण्याची गरज आहे. या अनुषंगाने बंजारा समाजातील जबाबदारी सांभाळणार्या लोकांनी सेवाभायांचे विचारांचे प्रसार करण्याचे कार्य हाती घेणे आवश्यक आहे. आपण सर्वच जानता आहात की, सेवाभायांचे विचार लिखीत स्वरुपात उपलब्ध नाहीत तरी जे उपलब्ध साहित्य आहे त्याचाच प्रसार प्रचार होणे गरजेचे आहे. सध्या आपण पाहतो की सेवाभाया यांच्या प्रतिमेविषयी विनाकारण वाद सुरु आहे. नव नविन संघटना, चळवळी, आपआपल्या परिने सेवाभाया यांच्या प्रतिमा तयार करीत आहे. हे भोळ्या बंजारा समाजाला आणखीनच दिशाहीन करण्याचे कार्य आहे म्हणून या बाबत विनाकारण वाद न करता सेवाभाया यांच्या कार्याचा, विचारांचा प्रसार होणे गरजेचे आहे. सेवाभाया यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…

प्रा.डॉ. साहेब राठोड पाथरी मो. 8600294344