आपण आपल्या देशातले आहोत की परके हे कळायला आता आपल्यालाच चिंतन करावंसं वाटतंय !!! परवाची ठाण्यातील गोष्ठ आहे. मी गोखले रोड वरून चालत तीन हात नाक्याला येत होतो. एक रिक्षावाला आणि दोन तीन टपोरी मध्ये वाद चालू होता , खूप अंगभर ढोसुन प्यायले होते दोन बरे होते , भडक लेल्या मित्राला दूसरी रिक्षा पकडू असं सांगत होते , पण हा भाई रिक्षात बसलेल्या पांढरपेशा ग्रुहस्ताला रिक्षातून उतरायला दम देत होता , आम्ही बरेच लोकं जमलो होतो पण कोणी मध्ये पडायला तयार नव्हत. तो शिव्यांची लाखोटि वाहत होता , मीच त्या रिक्षावाल्याला विचारलं पहला कोण पसेँजर रिक्षा पकड़ा ? तो बोलला हे बसलेले साहेब !!!! मी साहेबाला बोललो तुम्ही रिक्षा पकडली तर निघाना ! अहो साहेब हा रिक्षा जावु देईल तेव्हां ना ? मी त्या फूल टु भाई ला बोललो अरे भाई टु सलमान सारखा हन्ड्सम काय अश्या फालतू रिक्षा साठी भांडतोयस !!! त्याला माझे शब्द शहारे आणायला काफी होते , त्याचे दोन मित्र बोलायला लागले बघ साहेब तुला सलमान बोलले !!! तो एकदम खुश ….अभी रिक्षा कॅन्सल,!!! आता आणखी एक एक क्वॉर्टर हो जाये. ते गेले आणि रिक्षातून उतरलेल्या ईसमाला मी विचारले ??? बाहेर गावावरुण आलात काय ??? ते बोलले आणि मी चाट पडलो !! नाही हो साहेब या दूकानाच्या पाठीमागे मी राहतो !!! मी वकील आहे !!! तरी तुम्ही त्या टपोरीच्या शिव्या खात होता ? द्यायची दोन मुस्काटात ??? ते बोलले नाही हो साहेब आपल्या येरियात भांडण केले असते तर बाजूच्या लोकाना संदेश चुकीचा गेला आसता ??
मला त्यांची गोष्ठ बरी वाटली कारण भानगडीत पडायला कोणी तयार नसतो !!! आणि इथेच सुरुवात होते कोपर्डि सारख्या गावातील अमानुष पणाचा कळस गाठणार्या घटनेला !!! ही कथा एकट्या नगर मधल्या कोपर्डिचि नाही !!! हे लोण आपल्या गावा पर्यंत पोहोचलेल आहे ???
प्रश्न असा आहे की दोष कोणाला द्यायचा ? मालमत्तेसाठी मुलगा बापाच्या इंद्रियावर लाथा बूक्क्यानी जीव जाई पर्यंत मारतो. त्याला तसंच रात्रभर विव्हळत सोडतो आणि वैद्यकीय उपचारांशिवाय तो मरतो !!!! कुठे गेली आपली नीति मत्ता ??? का कोणी वाचवायला पुढे आला ??
शेवटी मायेचा पाझर कधीच कमी पडत नसतो , कमी असते संस्कारांची !!! आपल्या पाल्यांना जरूर प्रेम करा आणि त्याला संस्कारांचे धडे घरातूनच द्या . शेवटी समाजात त्यांना प्रतिस्टित म्हणून वावरायचे आहे .
गणेश जाधव
~ गोर कैलास डी राठोड
बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल,
www.banjaraone.com