आ. प्रदिप नाईक यांच्याबद्दल मतदार संघात नाराजी-प्रफुल्ल राठोड

किनवट (प्रतिनिधी) – नुकताच भाजपामध्ये नागपूर येथे देवेद्र फडवणीस यांच्या उपस्थीत प्रवेश केला. वरिष्ठानी कामाला लागा असा संदेश दिल्याने मी माहूर व किनवट तालुका पिंजून काढला. ठिकठिकाणी ग्रामीण जनतेशी संवाद साधला. यातून आमदार म्हनूद दोन वेळेस प्रतिनिधीत्व करणारे नूतन आमदार प्रदिप नाईक यांनी कुठलाही विकास केला नसल्याने दोन्ही तालुक्यातील जनतेत प्रचंड नाराजी असून असंतोष खदखदत आहे असेभाजपाचे भावी उमेदवार तथा मांडवीचे रहिवाशी प्रफुल्ल प्रकाश राठोड यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले.

2014-09-21_123011

मी माहूर तालुक्यातील वानोळा, कुपटी, चिंचखेड, मांडवी परिसरातील तसेच किनवट तालुक्यातील इस्लापूर, जलधरा, बोधडी, अप्पारावपेठ परिसरातील सर्व गांवे, वाडय़ा, तांडे व गुंडे मधील मतदाराशी संपर्क साधून संवाद केला. ह्या संपर्क दौर्यात किनवट व माहूर तालुक्यातील विकास कामे ठप्प असुन सा.बा.व सिंचन विभागाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे असंख्य तक्रारी आल्या. गत पाच वर्षापुर्वी इस्लापूर येथे मंजूर झालेले शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करून शकले नाहीत. प्रत्येक तालुक्यात मंजूर असलेले सामाजीक न्याय भवन किनवट किंवा माहूर येथे आणण्यात आमदार अयशस्वी ठरले. केवळ टक्केवारीमुळे गुत्तेदारी फोफावली असून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट प्रतीचा झाला आहे. यामुळे कोटय़ावधी रूपये खर्च करून ही बांधलेले रस्त्यांची दूर्दशा कायम असून रस्ते खड्डेय आहेत असे लोक संवादातून निदर्शनास आले. माझे काका लोकनेते कै.उत्तमरावजी राठोड हे तीन वेळा आमदार व दोन वेळा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. यावेळी त्यांची पुण्याई मला काम देत आहे. नुतन आमदार प्रदिप नाईक यांच्यावर किनवट-माहूर तालुक्यातील जनता प्रचंड नाराज असल्याचे दिसून आले.