एस.टी.चे आरक्षणासाठी भारतात मोठे आंदोलन उभे करणार – राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव कल्याण- मुंबई

महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्व बंजारा समाज एस.टी. (अनुसुचीत जमातीचे) सर्व निकश पुर्ण करत असुन बंजारा समाजाला एस.टी. कॅटेगरीत त्वरीत आरक्षण मिळावे अन्यथा राष्ट्रीय बंजारा टायगर्स व बंजारा समाजाच्या वतीने अति तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी कल्याण येथिल पत्रकार परिषदेत दिला.संपुर्ण देशात एकच भाषा, रानावनात व गावापासुन दुर राहणारा तसेच स्वभावातील बुजरेपणामुळे व भिन्न संस्कृती यामुळे हा समाज मुख्य प्रवाहापासुन दुर राहिलेला आहे.त्यामुळे बंजारा समाज अतिमागासलेला असुन बंजारा समाजाचा तांडा आजही भौगोलीक दृष्ट्या गाव व शहरा पासुन अलिप्त राहिलेला आहे.त्यामुळे देशाची अतिप्राचिन संस्कृती जपणा-या या बंजारा समाजाला एस.टी.कॅटेगरीचे आरक्षण मिळावे असे श्री जाधव यांनी सांगितले. राज्यात व देशात एकाच पक्षाचे सरकार असुन या सरकारने निवडणुकीपुर्वी या समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते.तसेच दिनांक १८ मार्च २०१५ रोजी मुंबई येथे समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात मा.सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनीही आरक्षणासह आमच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे बंजारा समाजाची सहनशिलता संपत आली असुन सरकारने त्वरीत हा विषय मार्गी नाही लावला तर राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल.त्यानंतर होणा-या परिणामास सरकार जबाबदार राहील असेही आत्माराम जाधव यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेपुर्वी संघटनेची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. देशातील सर्व बंजारा संघटनांना एकत्र आणुन देशपातऴीवर एक कोअर कमिटी स्थापन करण्याचे यावेऴी सर्व संमतीने ठरविण्यात आले.त्यासाठी मुंबई , इंदौर किंवा सुरत येथे लवकरच सर्व संघटनांच्या पदाधिका-यांची बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. काही लोकांनी आदिवासींना आरक्षण मिळू नये म्हणुन आरक्षणाची मागणी केलेली आहे,त्यामुळे मराठा व पटेल समाजाच्या आरक्षणाच्या मागणीस राष्ट्रीय बंजारा टायगर्सचा विरोध असल्याचेही यावेऴी जाधव यांनी सांगितले.तसेच यावेळी ‘कल्याण’ येथील बंजारा समाजाचे तरुण-तडफदार व युवा कार्यकर्ते-“समाजसेवक मा. मदन जाधव”यांची संघटनेच्या “राष्ट्रीय उपाध्यक्ष”पदी निवड करण्यात करण्यात आली.
या प्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव वाल्मीक पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष आत्माराम एच.जाधव, राष्ट्रीय संघटक मुरलीधर चव्हाण, राष्ट्रीय कोषाध्यक्ष राजेश नाईक, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणपती राठोड, प्रदेश सरचिटणिस अशोक चव्हाण, गुजरात प्रदेशाध्यक्ष कैलास राठोड, उत्तर प्रदेशाध्यक्ष डॉ.श्रीकांतसिंग पवार, राजस्थान प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश बंजारा, महाराष्ट्र प्रदेश संघटक जगदिश राठोड, यांचे सह पदाधिकारी उपस्थित होते.