श्री. सतिष एस राठोड ✍
कल्याण :- कल्याण येथे जागतिक महिला दिना निमित्त “सन्मान स्त्री शक्तीचा” कार्यक्रम कार्यसम्राट आमदार मा. नरेंद्र पवार यांच्या विषेश सहकार्याने व भारतीय जनता पार्टी सहकार सेल, सांस्कृतिक सेल, महिला बचत गट यांच्या संकल्पनेतून के.सी गांधी स्कुल (अॉडिटोरिअम) कल्याण पश्चिम येथे करण्यात आले होते.
महिला सबलीकरण, सक्षमीकरण, नवीन बचत गट नोंदणी, उद्योग तसेच उद्योजकांची माहिती व प्रशिक्षण, नृत्य अविष्कार , सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी कुंकू व सत्कार समारंभ असा आगळा वेगळा कार्यक्रम पहिल्यांदाच कल्याण नगरीमध्ये उत्कृष्टपणे पार पडले.
तसेच कार्यक्रमाचे खास आकर्षण मराठी सिने कलाकार भाविका निकम, सुजाता कांबळे, धनश्री दळवी, मिनल बाळ यांनी उपस्दथीती र्पशविली. प्रशिक्षक म्हणून अमोल झवेरी यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमात ४५० ते ५०० महिलांनी सहभाग घेतला. तसेच उपस्थित महिलांना हळदी कुंकू, विशेष असे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात भाग घेणार्या कलाकार, सिने तारकांचा व समाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती सौ. हेमलता पवार, सौ. पुष्पा रत्नपारखी, भावना मनराजा, स्वप्नील काठे, गौरव गुजर, रवी गायकर, प्रकाश पाटील, दिपेश ढोणे, महेंद्र मिरजकर, अतुल प्रजापती, हर्षल साने या पदाधिकार्यांची उपस्थिती होती. तसेच सर्वा पदाधिकारी , महिला आघाडी, शहर सेल, प्रभात आध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, कार्यकर्ते यांनी उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. भावना मोरे यांनी केले.प्रमुख आयोजन रविंद्र महाडीक, योगेश पवार यांनी केले होते. तसेच हे कार्यक्रमात यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ज्ञानेश्वर काकड, किशोर काकड, तिर्था शेट्टी, अंबिका सारंग, अक्षता महाडीक, सायली जाधव, अविनाश आंधळे, दत्ता ढोले, नरेश आंब्रे, तसेच सहकार सेल व सांस्कृतिक सेलचे पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.