कल्याण येथे दोन दिवशीय सत्संग स्नेहमिलन समारोह उत्साहात संपन्न

■ हजारो समाजबांधवांनी घेतला सत्संग कार्यक्रमाचा लाभ.

कल्याण या ऐतिहासिक नगरीत भरला भक्तांचा जनसागर

सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी देखील सत्संगचा लाभ घेतला.

(श्री. सतिष एस राठोड) ✍

कल्याण :- अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार समिती आणि तिज उत्सव कृती समिती , कल्याण (प.) यांच्या संयुक्त विद्यमाने – अनुपम नगर येथील जयंत नथ्थु देवळेकर मैदानावर दि.१२व १३ जानेवारी २०१९ रोजी अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार चे संस्थापक-प.पु. ब्रम्हलीन संत श्री. लक्ष्मणचैतन्य बापुजी यांच्या असिम कृपेने ” दोन दिवशीय सत्संग स्नेहमिलन समारोह कार्यक्रम ” अतिशय उत्साहात व हर्षोल्हासामध्ये संपन्न झाला.

या सत्संग स्नेहमिलन समारोह मध्ये लक्ष्मणचैतन्य बापुजींचे कृपापात्र शिष्य-श्री. श्यामचैतन्य महाराज , श्री. शांतीचैतन्य महाराज आणि श्री. सागरचैतन्य महाराज यांनी आपल्या अमृतवाणीमधून उपस्थित भक्त व भाविक यांना मार्गदर्शन केले.

■ श्री.श्यामचैतन्य महाराज यांनी आपल्या वाणीतून समाजातील युवकांना संदेश दिला की , आजच्या तरुण युवा पिढीने व्यसनापासून दूर रहावे तसेच समाजातील अनिष्ठ चालिरीती व परंपरेचा नायनाट करावा व आधुनिक युगाची कास धरावी जेणेकरुन समाजात चांगले चैतन्य निर्माण होऊन एक सशक्त व सोनेरी भारत देश निर्माण होईल. तसेच महिला भगिनी यांनी आजच्या युगामधे आपल्या मुलींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे असे सांगितले.

■ श्री. शांतीचैतन्य महाराज यांनी प.पु, लक्ष्मणचैतन्य बापुजी यांच्या जिवनावर आधारित कथा सांगितली यामध्ये प.पु. बापुजी यांनी ब्रम्हलीन संत दगाबापू आणि भगवान रामदेवजीबाबा यांना कशाप्रकारे आपला गुरु मानला याविषयी भक्त व साधक बांधवाना मार्गदर्शन केले आणि आजपर्यंत आपण भरपूर कथा वाचून ऐकत आलो आहोत तर ,आजपासून आपल्याला एक नवीन कथा वाचायला सुरुवात करायची आहे. ती म्हणजे ‘प.पु.लक्ष्मणचैतन्य बापुजी कथासार!’ प.पु.बापुजींची कथा वाचल्याने आपल्या जिवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. असेही

■ श्री. सागरचैतन्य महाराज यांनी या सत्संग समारोह मधून आपली अमृतवाणी कथन केली. श्री.सागरचैतन्य महाराज यांनी धर्माची व्याख्या स्पष्ट करुन सांगितली.यामधे त्यांनी सांगितले की,प्रत्येक समाजाला धर्म आहे परंतु आपल्या समाजामधे ‘हिंदू धर्म ‘ हा श्रेष्ठ आहे आणि या धर्माचा जो कोणी आचरण करेल त्यांचा उद्धार नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही.

या स्नेहमिलन कार्यक्रमास माजी खासदार व विद्यमान आमदार हरिभाऊ राठोड , कल्याण (प.) येथील आमदार- नरेंद्रजी पवार, महापालिकेचे मा. महापौर- राजेंद्र देवळेकर, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. प्रकाश शेठ मुथा यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि परिसरातील असंख्य समाजबांधव उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी-राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा तिज उत्सव कृती समितीचे अध्यक्ष- मदनभाऊ जाधव,नायक-भिमरावभाऊ राठोड , कोषाध्यक्ष -अशोकभाऊ राठोड , समाजसेवक – रमेशभाऊ तंवर, कैलासभाऊ तंवर , विश्वनाथभाऊ तंवर , राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे प्रदेशाध्यक्ष- अशोकभाऊ चव्हाण , प्रदेश सरचिटणीस तथा पत्रकार – सतिषभाऊ राठोड, तालुकाध्यक्ष-अशोकभाऊ राठोड, तालुका सचिव- केवलसिंग तंवर , शहराध्यक्ष- ज्ञानेश्वर राठोड , करणभाऊ जाधव , किरण राठोड ,सुदाम राठोड , सुभाष चव्हाण, संजय राठोड , रामकिसन राठोड , अरुण तंवर , साईदास राठोड सर ,ज्योतमल महाराज, उमेशभाऊ राठोड तसेच , अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार आणि तिज उत्सव कृती समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

बापूजींचा आशिर्वाद घेतांना बंजारा लाईव्ह चे पत्रकार श्री. सतिष एस राठोड
बापूजींसोबत आयोजक मित्र परिवार
सत्संग चालू असतांना भजनावर आनंदोत्सव साजरा करतांना तिज उत्सव कृती समितीचे अध्यक्ष मा. मदनभाऊ जाधव , कैलासभाऊ तंवर व मान्यवर
सत्संग चालू असतांना भजनावर आनंदोत्सव साजरा करतांना चैतन्य साधक परिवार भक्तगण