“कवीवर्य मा.श्रीकांत पवार साहेब यांच्या “केसरी केसुला” या बंजारा काव्यसंग्रहास: लेखक प्रा.दिनेश राठोड यांनी दिलेली प्रस्तावना सह-शुभेच्छा


​*मा.कवीवर्य श्रीकांत पवार साहेब यांच्या केसरी केसुला या बंजारा काव्यसंग्रहास* 

लेखक प्रा.दिनेश एस. राठोड यांनी दिलेली प्रस्तावनासह शुभेच्छा 🎼🎼🎼🎼🎼

 सर,“कविता म्हणजे काय?” हा प्रश्न सारखा सतावत होता. आपल्या काव्यातुनच खरी  व्याख्या कळली. आपले काव्य म्हणजे  ‘निःशब्दाला शब्दरूप करणारे साधन,’ ‘ गोरबंजारा भावनांचा उस्फूर्त आणि उत्कट  आविष्कार,’ ‘सृजनशील गोर आत्म्याचा उच्चार’ आणि अस बरच काही सांगता येईल.खर तर उदधृत केलेल्या गोष्टी आपल्या कवितेत जाणिवपूर्वक  असतात.आम्हास गर्व वाटतोय,हरविलेला गोर बंजारा शोधण्यात मदत करनारी आपल्या कविता!!!!खर तर अन कदाचित ,हीच कवितेची खरी  ओळख समजतो मी.. दि.5 फेब्रुवारी 2017 डोंबिवली येथे 90 वेअखिल भारतीय मराठी साहित्य  संमेलनासाठी निवडलेली “दुनिया बदलगी” या कवितेने बरच काही गोर  ऐतिहासिक खुना आपल्या कवितेने पक्क्या केल्या.गोर बंजाराचा स्वाभिमान उजागर झाला.आणि लक्षात आले, जी कविता ओळखण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, ती कविता आपल्याला फार पूर्वीपासून ओळखीची आहे, अगदी कळायला लागण्या आधीपासून ! ‘काऊ ये, चिऊ ये ‘ म्हणत कवितेनेच पहिला घास भरवला. अंगाई गीत गाऊन निजवले. ‘अटक मटक’ करत खेळात रंगवले आणि चंद्र, चांदण्या, तारे, फुले ह्यांनी आपले चिमुकले जग मोठे केले.पण यापेक्षाही वेगळी छाप सोडली आपल्या कवितेने !!!  आम्हावर…..

   मला शाळेत जी कविता भेटली ते कुंभाराचे हात घेऊनच.पण आमच्यातला आपल्या सारखा कसलेला कुम्हार/कवी शोधायला बराच कालावधी लोटला सर…….! आपल्या कवितेने गोर संस्कृती व वलयपूर्ण  जीवनाच्या जाणिवांचे आणि नेणिवांचे पदर उलगडत कळीचे फूल केले.  शिकवण्यापेक्षाही शहाणे आणि सुजाण केले. काय जादू आहे आपल्या काव्यात कवितेने भारावून जाऊन मी किती मनोरथे रचली. स्वतः लिहायला शिकलो…. कविता !! जस  कविता कधी वाटे व अजून वाटतय ‘घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात व्हावे’मधले हात व्हावे. कधी “तुतारी” वाजवून नव्या युगाचे रणभेदी व्हावे. कधी वाटे  क्रान्तिवीराचे वारस व्हावे, तर कधी नियमासाठी राजांनाही “खबरदार” म्हणणारा इमानी सावळा व्हावे. पण असी किती वचने टिकली माहित नाही .. पण आपल्या कवितेने स्वप्न बघायला व ते कसोटीत उतारायला शिकवले. नव्हे तर….अस्सल गोर बनायला शिकविले. आपल्या कवितेने आयुष्यातल्या प्रत्येक अवस्थेत वागण्याचे टप्पे जाणीवपूर्वक दिले.खरी साथ समजतो ही आम्हा उमेदीच्या काळात….

    जस शाळेत शिकताना,

‘तुला देवाने दिले रे, दोन हात, दहा बोटं’

ही बहिणाबाईंची कानउघाडणी आत्मविश्वास

आपल्या काव्यासमोर मला गौण वाटू लागले, केसे झाले? कळले नाही…. आयुष्याच्या संध्याकाळी “आयुष्य कसे जगायचे, कण्हत कण्हत की गाणे म्हणत?” ह्या आशादायी दृष्टीकोनाने उभारी आपल्या काव्याने दिली,  आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्या ती दीपस्तंभासारखी उभी राहतात  कधी मुलगी वा सखी म्हणून, कधी गुरु म्हणून, कधी पालक म्हणून, कधी मार्गदर्शक वा बाप  म्हणून ,नव्हे अस्सल गोर बंजारा म्हणून !

कवितेच्या नात्यातील   बहुविध रुपे शोधता येतात आपल्याच कवितेतून .  म्हणजे केवळ सृजनशील आत्म्याचा उच्चार नाही तर मूर्तरूप अविष्कार आहे.

मुलीची प्रत्येक समाजात ढासळलेल प्रमाण यावर माझे Disappearing..Its A Girl Child हे English भाषेतील  (A collection of poems) 

volume लिहिताना हरविलेली मुलगी शोधण्यात मी सार्थ ठरलो.. आपल्याच काव्याच्या अंतर्गत स्पंदनानी!! कोणत्याही सृजनात्मक कलाकृतीस तयार करण शिकावे आपल्याच कडून !! कोणी कविता शब्दात मांडतो, कोणी सुरात बांधतो,

 साहेब’ कोणी कविता कुंचल्यात रंगवतो, तर कोणी पाषाणात कोरतो. पण मात्र आपल काव्य काही वेगळच,  जसे एखाद्या दर्दभरी मनाच्या तानेतून आपल्या कवितेचे आर्त शब्द ऐकू येतात.!!!!!

 आपल्या कविता गोरवलय संस्कृतीच मन घडविण्या सोबतचत  गोरबंजारा भावी आयुष्य घडवविण्यास साह्य करते, ही अतिशयोक्ती तर नव्हेच..खरे तर एखादा द्रष्टा इतिहासाने दखलही न घेतलेल्या जमिनीच्या तुकड्याला जगाच्या भूगोलात मानाचे स्थान  ‘राष्ट्र’ म्हणून आकारतो.  ह्यासारख्या आपले काव्य व त्याच्या रंगित बहूविध छटा….   *आपल्या ह्दयात लपलेल्या त्या महान कवीला व कवितेला मानाचा दंडवत !!!*

 *आपणास उदंड आयुष्य मिळो..ही संत सेवालाल चरणी प्रार्थना*🙏🏻🙏🏻

✍प्रा.दिनेश एस राठोड 

    कैलास डी.राठोड 

वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ,मुंबई