कामगारांना पाच हजार रुपये प्रदान-कामगारांच्या डोळ्यातले आनंदाश्रृ हे मोठे बक्षिस निलेश राठोड यांचे मत

बुलढाणा दि.१४ फेब्रुवारी,२०१९:
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार व सिंदखेड राजा या दोन तालुक्यांतील ५० गावातील कामगारांसाठी देवानगर ता लोणार येथे भव्य कामगार नोंदणी व प्रमाणपत्र तसेच अर्थसहाय्य वाटप शिबीर कार्यक्रमाचे आयोजन निलेश राठोड विशेष कार्य अधिकारी,मंत्रालय यांनी केले होते,
महाराष्ट्र ईमारत व ईतर बांधकाम कामगार (सेवाशर्ती व विनीयम) अधिनियम कलम ३३ नुसार सर्व कामगारांच्या विकासासाठी कल्याणकारी योजना राबविल्या जातात,याबाबतीत कामगारांमध्ये जाणीव जागृती व्हावी हातमजुरी करणार्या मजुर कामगारांना शासनाच्या सवलतींचा फायदा व्हावा या हेतुने निलेश राठोड यांनी किनगांव जट्टू परिसरांत कामगार नोंदणी व प्रमाणपत्र वाटप शिबीराचे आयोजन केलेले होते,

Nilesh prabhu Rathodकार्यक्रमानंतर दिवसभर जवळपास तीन हजार पेक्षा अधिक कामगारांनी नोंदणी केली होती त्यातील काही पात्र कामगारांना अवजारे खरेदीसाठी प्रत्येकी ५०००/- रुपयांचा लाभ पहिला टप्पा म्हणून दि.११ फेब्रुवारी,२०१९ रोजी देण्यात आला असून कामगारांच्या चेहर्यावर आनंदाश्रृ पसरले आहे.या लोभामुळे कामगारांना काम करण्यासाठी आवश्यक असणारे अवजारे खरेदी करता येणार आहे व पुन्हा नव्याने जोमाने ते कामाला सुरूवात करणार आहेत,परिसरातून कामगारांना लाभ मिळाल्यानंतर निलेश राठोड यांच्याबाबतीत कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.

Nilesh Prabhu Rathod