■ वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळासाठी ३०० कोटींची तरतूद.
■ बंजारा समाजासह सर्व भटक्या/विमुक्त समाजातील सामाजिक संघटनांनी केलेल्या पाठपुराव्याला यश.
(श्री. सतिष एस राठोड) ✍
मुंबई:- वसंतराव नाईक विकास महामंडळाला बंजारा समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केली, सरकारने इतर महामंडळाला भरीव निधी उपलब्ध करून दिला होता परंतु वसंतराव नाईक विकास महामंडळाला डावलल्याने बंजारा समाजातील सामाजिक कार्यकर्ते तथा विविध संघटनांचे प्रतिनिधी संतप्त घेऊन विमुक्त जाती, भटक्या जमाती तथा इतर मागासवर्गीय मंत्री प्रा.राम शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी खेडकर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक,या विभागाचे सचिव यांना भेटून आक्रोश केला होता.
त्यावर संबंधीत अधिकार्यांनी मंत्री महोदय यांची भेट घडवून आणून निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार दि. ८/१/१९ रोजी मा.ना.शिंदे यांची भेट वसंतराव नाईक विमुक्त विकास महामंडळाला निधी उपलब्ध करून देतांना अन्याय कसा झाला हे पटवून दिले होते, त्यानुसार ना.शिंदे यांनी पुढील मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव आणू असे आश्वासन दिले होते त्यानुसार मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव आणून भरघोस निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल ना.शिंदे यांचे आभार मानुन सत्कार देखील केला.
यावेळी महसुल राज्यमंत्री ना. संजयभाऊ राठोड, राष्ट्रीय बंजारा परिषदचे महासचिव इजि. सुभाष राठोड,रामराव महाराज भाटेगांवकर, सुभाष राठोड मंठा,भारतीय जनता पक्षाचे विमुक्त भटके आघाडीचे चिटणीस विलास पवार, राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे प्रदेशाध्यक्ष- अशोकभाऊ चव्हाण, प्रदेश सरचिटणीस-सतिषभाऊ राठोड (पत्रकार) , इंजि.रमेश पवार,इ समाजसेवक निधी मिळावा म्हणून सातत्याने पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते राजेश चव्हाण जालनेकर, रितेश पवार यासह अनेक कार्यकर्ते समाजप्रेमी नागरीक उपस्थित होते.