वाढदिवसाचे अभिष्टचिंतन….
*किसनराव राठोड : सामाजीक भान जपणारा उद्योगपती*
– एकनाथराव
भारतीय विविधतेच्या सौंदर्यामध्ये आपल्या प्राकृत शैलीने अधिक भर घालणारी विलोभनिय अशी बंजारा संस्कृती.
या संस्कृतीने अनेक थोररत्ने दिली.ज्यांनी या मातृभूमीचा गौरव वाढवीला. हा या संस्कृतीचा वारसा आजही अबाधित आहे.म्हणूनच आज समाजाला अभिमान वाटणारी अशा विविध क्षेत्रातातुन अनेक व्यक्ती कालपरत्वे पुढे येऊ लागली.
कालपर्यंत महाराष्ट्राला परिचित नसणारा व्यक्ती आज सर्वश्रुत होतोय,ते म्हणजे उद्योगपती किसनराव राठोड..! उद्योगक्षेत्रात कालपर्यंत टाटा,बाटा,अंबानी,अदानी,बिर्ला,महिंद्रा,जिंदाल,गोदरेज,महिको, सुब्रतो जैन,किर्लोस्कर,गाडगीळ,खेतान,अशीच नावे दिसायची. राठोड,पवार,चव्हाण,जाधव शोधूनही सापडत नसत.परंतु आपल्या अपार परिश्रमाने आणि बुद्धिबळातील सोंगट्याप्रमाणे राखीव चालीसारख्या कौशल्याने बाजी मारल्यागत किसनराव राठोडानी उद्योगक्षेत्रात भरारी घेऊन आपलं नाव पुढे आणत आहे.त्यारूपाने समाजाचं नाव उद्योगक्षेत्रात पाहताना छाती फुलून येते.
उद्योगक्षेत्रातल्या व्यक्तीस सामाजीक भान आणि जाण कशी असणार..? एरव्ही वाटणारा हा प्रश्नच आज मिटल्यागत झालाय. किसनराव राठोड आणि माझी आेळख अगदी सुरुवातीच्या त्यांच्या शांतीस्थळ येथील देशभरातील कलारसिक,प्रतिभावंत,साहित्य संस्कृतीच्या गौरव कार्यक्रमापासून. भक्तीधाम वगैरे हे त्यांचे नंतरचे अधिष्ठान.
परंतु प्रचंड कलारसिक व स्वत: भोवती माणसाची गर्दी खेचून घेणारा. विरोधकालाही शिताफिने आपल्या जाळ्यात अडकवीणार्या किसनरावाची ‘किसनलिला’ मात्र भूरळ घालणारी आहे. बंजारा समाजातला उमद्या मनाचा दिलदार व्यक्ती म्हणून किसनरावभाऊकडे पाहिल्या जाते. भक्कम ऊर्जेच्या या व्यक्तीचे समाजाने समाजासाठी उपयोग करून घ्यायला हवे, न कि स्वत: भोवती गुरफटलेल्या अतृप्त लाेभासाठी. म्हणूनच कदाचित त्यांच्या अवतीभोवती असणार्या बद्दल सर्वसामान्यामध्ये नाराजीचे सुर आज ऐकायला मिळते.
फक्त उद्योगच नव्हे तर सर्व क्षेत्राची आणि समाजासाठी कोण खऱ्या तळमळीने काम करतोय याची अपडेट व्यस्त जीवनातही ठेवणारा हा आगळावेगळा ”भाऊ!”
बार्टीच्या धर्तीवर विमुक्तासाठी वनार्टी व्हावी.याकरिता गेल्या अनेक वर्षापासून मी परिश्रम घेत आहे.तसे याबद्दल सा.न्यायमंत्री ना.बडोले साहेबानी पुर्णत: सकारात्मकता दर्शवली होती.परंतु तेवढ्यातच मराठा मोर्चाचा रण पेटला.त्यांना शांत करण्यासाठी विमुक्त -भटक्या ऐवजी मराठा समाजासाठी ‘सारथी’ नावाने संस्था स्थापन केली. समाजातील ९९% लोकांना या संस्थेचं महत्व अन् बार्टी-वनार्टी म्हणजे काय?यापासून अनभिज्ञ आहेत.परंतु किसनरावभाऊ सोबत मुंबईला जेव्हा भेट झाली,तेव्हा त्यांनी स्वत:हून माझ्या या प्रयत्नाची आणि या संस्थेबद्दल विषय काढला. मला आश्चर्याचा धक्काच बसला, उद्योगक्षेत्रात व्यस्त जीवन असणार्या या व्यक्तीस येथपर्यंत कशीकाय माहिती राहु शकते? असा प्रश्नही पडला. परंतु त्यांचे सामाजीक भान आणि समाजीक संवेदना किती समाजाभिमुख आहे.याची प्रचिती करून देणारा आहे.जेव्हा कधी भेट होते,तेव्हा मोठ्या आस्थेनी “तांडेसामू चालो” अभियानाची आवर्जून विचारपुस करतात.सदैव धिर देत आले.
समाजातील प्रत्येक कार्यास मदत करणारा, कधिही ‘नाही’ म्हणणारा असा दानशूर व्यक्तीमत्व बंजारा समाजाला आज घडीला लाभलेला आहे. किसनरावाच्या काही भूमिकेविषयी अनेकांच्या मनात नाराजी असल्याचे बोलले जाते. सळोई,डफडाने परिवर्तन किंवा विकास घडून येऊ शकत नाही.अशी बोचरी टीकाही त्यांच्यावर केल्या जाते.औरंगाबादच्या सळोई महोत्सवामुळे ‘सळोईमॅन’ म्हणून त्यांच्याविषयीे उपरोधिकपणे बोलल्याही गेले. परंतु किसनरावानी या नकारात्मकतेला कधी मनाला लावून घेतले नाही.
समाजात आज अनेक शक्ती आपापल्यापरीने काम करित आहे.ते लहान असोत वा मोठे.परंतु उर्जा मात्र समाजासाठी खर्च होत आहे.
जर हि भिन्नभिन्न स्तरावरिल शक्ती सकारात्मकतेनी एकवटली तर,एक ‘सुपरपावर’ म्हणून उदयास येऊ शकेल, शिवाय समाजातील काही धनदांडग्यानी देखिल किसनरावासारखा काळीज जपण्याची गरज आहे. तेव्हा कुठे साहित्यसत्ता,धर्मसत्ता आणि राजसत्ता या तिन्ही सत्तावर सन्मानाने गोरध्वज फडकू शकेल. समाजासाठी निस्पक्षतेनी आणि तळमळीने कार्य करणार्या जी कोणी
व्यक्ती किंवा संघटना असेल त्याचा आदर करण्याची संस्कृती आज रूजणे फार गरजेचे झाले आहे.स्तुती करण्यासाठी देखिल काळीज असावा लागतो. पाय आेढण्याचे आजार आता समाजातुन हद्दपार करण्याची वेळ आली आहे.
समाजासाठी मोठया काळजांनी आणि तेवढ्याच प्रगल्भतेनी कसं वावरावं हे किसनराव राठोडकडून शिकण्यासारख आहे.सामाजीक बांधिलकी जोपर्यंत जीवंत,तोवरच एकाअर्थाने समाज जीवंत राहू शकते.त्यासाठी प्रारंभापासूनच ‘समाजमन’ ही जीवंत ठेवावं लागतं.
किसनरावामध्ये ताकदीची समाजआस्था आहे.यातूनच समाजासाठी काही विधायक घडून आणल्या जावेत.जेणेकरुन समाजाला खर्याअर्थाने सक्षमीकरणाचे उन्मेष येईल. त्यांच्यारूपाने समाजाला एक दिलदार मनाचा आणि सामाजीक भान जपणारा,उद्योगक्षेत्रात समाजाचा नाव कोरणारा नवा दमदार व्यक्तीमत्व मिळाला.हि आनंदाचीच बाब मानावी लागेल.
यापुढेही त्यांच्या हातून समाजहितदायी कार्य घडत राहो.उत्तम आरोग्य लाभो.या शूभकामनासह…!
नागपूर, भ्रमणध्वनी : ९८५०१३१३६८
Tag : Kisanrao Rathod, Kisan Rao Rathod, Rashtriya Banjara Parishad National President, Gor Banjara Udyogpati, AT Oil, Intratech, Jai Sevalal, Jai Hamulal