नागपूर (प्रतिनिधी) – कृषीप्रधान राज्याचा महत्वपूर्ण तसेच शेती व शेतकर्यांचा सन्मानाचा सण
म्हणून ओळखल्या जाणार्या कृषी दिनाला सार्वजनिक सुट्टी घोषित करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरकेकडे वसंतराव
नाईक् प्रसार व प्रचार समितीचे संयोजक एकनाथ
* विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके प्रसार समितीच्या मागण्यासाठी मुख्यमंत्र्याना लिहिणार पत्र
* वसंत पुरके कडून एकनाथ पवारांच्या मागणीचे अभिनंदन
पवार यांनी केली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच कृषिदिनाला सार्वजनिक सुट्टी
तसेच समाजातील न्यायावंचित घटकांच्या
पुनरूत्थनासाठी बार्टीच्या धर्तीवर वनार्टी संशोधन व
प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी कृतीशील
कार्यकर्ते साहित्यिक एकनाथ पवार नागपूर यांनी
शासनापुढे अत्यंत महत्वाची मागणी करून सातत्याने
संवैधानिक पाठपुरावा करीत आहे. कृषीक्रांतीचे जनक,
शेतकर्याचे कैवारी, महानायक वसंतराव नाईक
यांची जयंती महाराष्ट्र शासन कृषिदिन म्हणुन साजरा
करीत आहे. परंतु कृषी प्रधान राज्यात कृषिदिन
सणासारखा मोठय़ा उत्साहात साजरा करण्यासाठभ तसेच
शेतकर्यांना प्रतिष्ठा बहाल करण्यासाठी कृषिदिनाची
सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे तसेच विमुक्त-भटक्या
समाजाच्या विकासासाठी विद्यार्थ्यांच्या प्रशासकीय प्रशिक्षणासाठी आपण स्वतः
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याची कबुली
विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी वसंतराव नाईक
प्रसार व प्रचार समितीला दिली. कृषीदिनाच्या सार्वजनिक सुट्टी बरोबर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थांच्या (बार्टी) धर्तीवर
विमुक्त भटक्या समाजाच्या विकासासाठी स्वतंत्रपणे
वनार्टी अर्थात वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण
संस्था स्थापन करणे अशी देखील मागणी करण्यात
आली. विमुक्त भटक्या समाजाचा प्रशासकीय
सेवेतील प्रमाण शून्य टक्के असून ते वाढविण्यासाठी
स्वतंत्रपणे कुठलीही प्रशिक्षण संस्था नाही तसेच बोगस
जातीचा समावेश रोखण्यासाठी स्वतंत्र संशोधन
संस्था नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासुन राज्यात
विमुक्त-भटक्या समाजावर अन्याय होत असल्याची बाब
समितीचे संयोजक एकनाथ पवार यांनी प्रा.पुरके यांच्या
लक्षात आणून दिली. शिष्टमंडळानमध्ये प्रचार
समिती, वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना,
व संघर्ष वाहिनीचे अशोक पवार, राजू चव्हाण, होमा
बंजारा, सुजित चव्हाण, रामधन राठोड, दिनानाथ
वाघमारे, प्रकाश राठोड,मुकुंद अडेवार, इंदल पवार,
सुभाष जाधव, बाळू राठोड, आदिंचा समावेश होता.