कॅनडातील टोरांटोत कु. प्राजक्ता राठोडच्या चित्रकृतीची वाह…वाह..

2015-01-08_125131

कारंजा लाड (प्रतिनिधी) : कारंजा येथील जे.डी. चवरे विद्यामंदीरातील इयत्ता 10 वीत शिकणार्या कु. प्राजक्ता सह 25 विद्यार्थ्यांच्या 27 चित्रकृतीचे प्रदर्शन कॅनडामधील टोरांटो येथे नुकतेच संपन्न झाले. या विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रकृतीने टोरांटोवासियांना थक्क करुन टाकले. प्रत्येक प्रेक्षकाकडून बालकांची वाह…वाह.. करण्यात आली असल्याचे भारतात कामानिमित्त आलेल्या अनिवासी भारतीय सुनिता काण्णव यांनी सांगितले. तसेच या सर्व बालचित्रकारांचा शाळेच्या वतीने प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून स्वतः हजेरी लावली. टोरांटो मधील प्रदर्शनीमध्ये त्या चित्रांच्या स्मृतीबद्दल त्यांनी सविस्तर माहिती यावेळी दिली. बंजारा स म ा ज ब ा ं ध व ा ं त फ oऊ आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात कारंजा येथील वसंतराव नाईक सामाजिक सभागृहात कारंजा तांडय़ाचे नायक भिकासींग राठोड व कारभारी रामचंद्र चव्हाण यांनी प्राजक्ताला स्मृती चिन्हे देवून सन्मानित केले. 26 जानेवारी 2014 मध्ये जे.डी. चवरे विद्यामंदीरामध्ये चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यामध्ये कलाशिक्षक अशोक मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी जगविख्यात चित्रकारांची एकूण 45 चित्रे साकारली होती. या प्रदर्शनीला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला होता. या विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रकृती मानकरसरांनी अपलोड केल्यावर त्यांनाभरपूर लाईक मिळाल्यात. मानकरसरांच्या मित्रांनी सुद्धा त्या आपल्या मित्रांना पाठविल्यात व सातासमुद्रपार पोहचल्यामुळेच कारंजा मात्र सध्या कॅनडात स्थायीक झालेले स्टार अलायन्स या आयटी कंपनीचे सीईओ संदीप काण्णव यांना हि चित्रे खूपच आवडली. मानकर सरांच्या सोबत चर्चा करुन त्यांनी पुढची रुपरेषा ठरवली. टोरांटो आणि कोलरँडो येथील कम्युनिटी सेंटर्स सोबत संपर्क साधण्यात आले. स्विवकृत चित्रे एअर कुरीअरने पाठवून त्या स्विकृत चित्रांचे प्रदर्शन मागील आठवडय़ात टोरांटो येथील लायब्ररी हॉलमध्ये घेण्यात आले. त्या प्रदर्शनीचे उद्घाटन टोरांटो येथील कलाक्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेले कॅनेडियन बोरीस हेलमा आणि नताशा आयरिन यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनीला जो प्रतिसाद लाभला त्याची सविस्तर माहिती सुनिता काण्णव यांनी कारंजा येथे आल्यावर दिली. कु. प्राजक्ता कुशाग्रबुद्धीमत्तेची असून तिने इंटरमीजीयटची परीक्षा ए-ग्रेड मध्ये उत्तीर्ण केली आहे. उपजतच आर्टीष्ट असलेली प्राजक्ता, भारतिय बंजारा कर्मचारी सेवा संघाचे अमरावती विभागीय अध्यक्ष विलास राठोड यांची सुकन्या आहे. तिच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन होत असून तीच्या यशाचे श्रेय तिने आपले कलाशिक्षक अशोक मानकर व आपल्या आई वडिलांना दिले आहे. तिच्या निवडीचे अभिनंदन खुशाल राठोड, शालीक पवार, विरेंद्र पवार, प्रा. अनील राठोड, श्याम राठोड, आकाराम चव्हाण, मदन जाधव, प्रा. जय चव्हाण, प्रा. रतन राठोड, नेमीचंद चव्हाण, सुनिल राठोड यांनी केले आहे.