||गुढी|| मराठी कविता, कवी: निरंजन मुडे

गुढी

*कवी.*
*निरंजन मुडे*
*दि.८/४/२०१६*

*वाटसप रुपी जलाशयात,*
*भरली विद्बानाची होडी !*
पोहता येईना”निघती बुडबुडे,
म्हणे आम्ही जातीचे नावाडी !!

*खरं काय” खोटं काय,*
*की करतात नूसती लबाडी !*
सणासुदीच्या उत्सवामध्ये,
दाखवतात काहीतरी बिघाडी !!

*विटंबना करतात वरवर*
*आतून शासकिय सुट्टीची गोडी !*
जनाची सोडा मनाला तरी,
आसुदया जानीव थोडी !!

*अनंतापासुन पुर्वजांची,*
*चालत आली रूढी !*
यश,किर्ती,मागंल्याची,
उभारत राहू गुढी !!

*शेतकर्‍याना आजच्या दिवसाची,*
*असते फार गोडी !*
नांगर घेऊन शेतामंदे,
जायी रंगा,पतंगाची जोडी !!

*तोरण पताका लावून,*
*अंगणाची शोभा वाडी !*
पुरणपोळी”सारण संगे,
भातासोबत आंबट कडी !!

*खाल्ली का? न्यारीला कधी,*
*शिळी भाकर कांदयाची खोडी !*
खेळलास का? जंगलात कधी,
कुत्र्या संगे येडी !!

*आपणास व आपल्या परिवारास गुढीपाडवा व नवं वर्षाच्या शुभेच्छा.*

*निरंजन ब. मुडे*
*चिल्ली(ई) ता.महागाव*
*जि.यवतमाळ*
📞९०८२१९९८६७