रति,
मा.नामदार/खासदार/आमदार/ श्री…..
मंत्री/राज्यमंत्री….
लोकसभा/विधानसभा,मतदारसंघ/विधानपरिषद सदस्य.
विषय:गोरबंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करण्याबाबत…
महोदय,
ऊपरोक्त विषयी सविनय नमुद करण्यात येते की,महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला इतर राज्यातील गोरबंजारा समाजाच्या तुलनेत कोणत्याही संविधानिक वा शासकीय सोयी सुविधा अथवा सवलती नाहीत,परिणामी अजुनही महाराष्ट्रातील जवळपास सर्वच तांडे विकासापासून कोसो दूर आहेत,गौरवशाली संस्कृती व उज्ज्वल परंपरा असूनही तांड्यात मुलभुत सुविधा नसल्याने तांडेच्या तांडे विस्थापित शहरी व विकसीत भागाकडे स्थलांतरित होत आहेत,परिणामी अॅट्रोसिटीसारखे प्रतिबंधक कायदे नसल्याने त्यांच्यावर वारंवार अत्याचार अन्याय होतोय,आपणास लोकसभा/विधानसभा/विधानपरिषदेत निवडून आणण्यासाठी गोरबंजारा समाजाचा सिंहाचा वाटा आहे.
यामुळे आपल्याकडून अपेक्षाच नव्हे तर आपले कर्तव्य समजून गोरबंजारा समाजासाठी,गोरबंजारा समाजाचा हक्काचा प्रतिनिधी म्हणून गोरबंजारा समाजाच्या समस्या आपण सभागृहात मांडाव्यात तसेच शासनाकडे या कालावधीत रेटाने पाठपुरावा करून समाजाला न्याय द्यावा अन्यथा समाज जन आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही:यापुर्वी बुधवार दिनांक 18 मार्च, 2015 रोजी बंजारा समाजाच्या वतीने या प्रमुख मागण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे आपल्या उपस्थितीत मोर्चा काढला होता त्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
1) महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला कर्नाटक,आंध्र,तेलंगणा या राज्याप्रमाणे संवैधानिक सवलती लागू करणे.
2) 300 लोकवस्ती असलेल्या तांडया व वस्तींना महसूली गावांचा दर्जा देणे व स्वतंत्र ग्रामपंचायती करण्याकरिता संबंधितांमार्फत माहिती मागवणे व कार्यवाही करणे.
3)हिंदी भाषेनंतर सर्वाधिक बोलली जाणारी गोरबोलीस केंद्र सरकार सकारात्मक असून संविधानाच्या 8व्या अनुसूचित समावेश करून राजभाषेची मान्यता देणे .
4) बंजारा विद्यार्थ्यांसाठी क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट रद्द करणे.
5) गोरबंजारा विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप करिता आर्थिक तरतूद करणे,विजाभज बंजारा मुलामुलींकरिता शासकीय वसतीगृहाची स्थापना करणे तसेच स्वाधार योजना लागू करणे.
6) भूमिहिन शेतमजूरांसाठी वसंतराव नाईक स्वावलंबन योजना राबवणे.
7) कर्नाटक राज्याच्या धर्तीवर “सेवालाल तांडा विकास महामंडळाची” स्थापना करणे किंवा वसंतराव नाईक महामंडळावर भाप्रसे दर्जाचा अधिकारी नेमून त्याची कार्यकक्षा वाढविणे.
8) बंजारा कलावंतांना लाखा गोर मानधन योजना लागू करणे व बंजारा वस्तू,शिवणकाम,भरतकाम तसेच कलाकुशरीसाठी
महिला बचत गटांना अर्थ सहाय्य करणे.
9) दादा ईदाते आयोगाच्या शिफारशी प्रसिद्ध करून त्या लागू करणे.
10) लोक कसत असलेल्या व राहत असलेल्या जमिनींची मालकी हक्क देणेबाबत. भटक्यांचे गायरान चटईचे हक्क सुरक्षित करणे.
11)जात पडताळणी व त्यातील अडचणी दूर करणे तसेच राजपूत भामटा व छप्परबंद या जातींमध्ये मोठया प्रमाणात बोगस प्रमाणपत्र घुसखोरी थांबऊन पायबंद करणे.
12) वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेला भरीव निधी देऊन अशासकीय अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक करणे व त्याची कार्यकक्षा वाढवून पाणीपुरवठा,समाजमंदीर,शाळा,वाचनालय,व्यायामशाळा बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देणे.
13)विजा अ साठी अंतर्गत परिवर्तनियतेचा निर्णय रद्द करणे.
14) स्वतंत्र घरकूल योजना:- रमाई आवास योजनेप्रमाणे या समाजातील नागरिकांना सामकी माता आवास योजना जाहिर करणे.
15)बिगर आदिवासी विभागातील शासकिय आदिवासी आश्रमशाळेत भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांना 50 टक्के आरक्षण देवून त्यांना प्रवेश देणे.
16)विमुक्त भटक्या जमाती संशोधन संस्थेची अथवा गोरबंजारा कला अकादमी स्थापना करणे बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था, पुणे या धर्तीवर वसंतराव नाईक विमुक्त भटक्या जमाती संशोधन संस्थेची स्थापना करणे.
17)शिक्षण विषयक नेट,सेट,नीट,सीईटी,मलोआ व केंलोआत गुणांची सवलत देणे.
18) वसंतरावजी नाईक संशोधन केंद्र किंवा वसंतराव नाईक प्रतिष्ठान,मुंबई येथील जागावर स्थापना करणे.
19)बंजारा समाजातील विद्यार्थ्यांना IAS व IPS स्पर्धा परिक्षा, होस्टेल, रोजगार मार्गदर्शन केंद्राची स्थापना जिल्हास्तरावर करणे,अथवा यशदा येथिल प्रशिक्षणासाठी बंजारा विद्यार्थ्यांना जागा राखिव ठेवाव्यात .
20) अनुसूचति जमातीच्या विद्यार्थ्यांच्या धर्तीवर बंजारा जमातीच्या उमेदवांरांना भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण केंद्राची स्थापना करणे.
21) विदेशातील उच्च शिक्षणात विमुक्त भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना लागू करणे.
22) राज्य मागासवर्गीय आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर विमुक्त जाती व भटक्या जमातीचे प्रतिनिधीची कायमस्वरूपी नेमणूक करणे.
23)बंजारा समाजाचे महिला, पुरुष, मजदूर सारखे बांधकाम कामगार बंजारा नाका कामगार, बंजारा उसतोड कामगार व बंजारा मच्छिमार व्यवसायामध्ये काम करणारे कामगार आणि बंजारा महिला यांच्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन व बालकामगार व मच्छिमार कामगार यांना महामंडळाव्दारे प्रत्येक मजदूरापर्यंत योजना पोहचविणे व राहण्यासाठी घरे उपलब्ध करणे.
24)बंजारा समाजाच्या कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक प्रश्नाबाबत मंत्रालयात स्वतंत्र कक्ष तयार करणे.
25) गोरबंजारा जमातीतील ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभवशाली परंपरा जपण्याकरिता या समाजातील लोककलांचा प्रचार करणाऱ्या कलावंताना मानधन व ओळखपत्र तसेच बस प्रवासाकरिता सवलत देण्याबाबत योजना करणे.
26) बंजारा समाज शिक्षणासाठी व व्यवसायासाठी अल्प व्याज दराने कर्ज देण्यात यावे.
27) स्थानिक स्वराज्य संस्थेस लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देणे.
28) बंजारा समाजाच्या दुर्मिळ व वैभवशाली वस्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी जागतिक स्वरूपाचे गोरबंजारा कला,साहित्य,संस्कृती व वस्तुसंग्रहालय स्थापन करून बंजारा समाजाच्या श्रध्दास्थानांचा विकास करणे.
29) सतगरू सेवालाल महाराज जयंती 15 फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर करणे अथवा सेवालाल महाराजांचे टपाल तिकिट काढणे.
30) गोरबंजारा समाजासाठी मुंबई येथे गोरबंजारा भवणसाठी जागा उपलब्ध करून देणे.
या प्रमुख मागण्यांसाठी आपण शासनाकडे याच अधिवेशन कालावधित मागण्या मान्य होईतोपर्यंत पाठपुरावा करावा,अशी सर्व गोरबंजारा समाजाच्या वतीने आपणास विनंती आहे.
आपले,
सर्व गोरबंजारा समाज बांधव,महाराष्ट्र.