गोरबंजारा समाज तिज उत्सव कृती समिती-कल्याण

🙏जय सेवालाल🙏
दि.३०/०८/२०१५.रविवार,रोजी ‘कल्याण(मुंबई)’ येथे “गोरबंजारा समाज तिज उत्सव कृती समिती-कल्याण” च्या वतीने सालाबादाप्रमाणे ” पारंपारीक तिज उत्सव आणि कौटुंबिक स्नेह मेळावा” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
        या कार्यक्रमाचे ‘अध्यक्ष-बंजारा समाजाचे प्रसिद्ध उद्योजक व दानशुर-मा.शंकर पवार’ हे होते.आणि प्रमुख पाहुणे-भिवंडी लोकसभा क्षेत्राचे खासदार-मा.कपिल पाटील,कल्याण पश्चिम चे आमदार-मा.नरेंद्र पवार,शिवसेना शहरप्रमुख-मा.विश्वनाथ भोईर,”बंजारा समाजाचे युवा नेतृत्व आणी राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष-मा.आत्मारामभाऊ जाधव”,बंजारा समाजाचे विधानपरीषदेचे आमदार-मा.हरीभाऊ राठोड,विधानभवन चे उपसचिव-मा.यु.के.चव्हाण,DCP-विनयकुमार राठोड,BMC बॅंक चे संचालक व सहाय्यक कामगार अधिकारी-मा.शेखरभाऊ राठोड,राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस-मा.अशोकभाऊ चव्हाण,प्रदेश संघटन सचिव-मा.विरेंद्र राठोड,ज्येष्ठ समाजसेवक-मा.ह्वी.आर.नाईकसाहेब,नायक-मा.भिमराव राठोड,कारभारी-मा.गोपीचंद आडे,तिज उत्सव कृती समितीचे संस्थापक-मा.उदयसिंग राठोड,बंजारा समाजाचे तरुण,तडफदार,युवा कार्यकर्ते व तीज उत्सव कृती समितीचे विद्यमान अध्यक्ष-मा.मदनभाऊ जाधव,सचिव-निलेशभाऊ पवार,कोषाध्यक्ष-अशोकभाऊ राठोड,इ.उपस्थित होते.
        या कार्यक्रमात बोलतांना खा.कपिल पाटील यांनी सांगितले की बंजारा समाजाच्या विकासासाठी जी काही मदत लागेल ती मी करण्यास सदैव तयार राहील.आणि आमदार नरेंद्र पवार यांनी बंजारा समाजाच्या समाज मंदिरासाठी ५०’लाख रुपये निधी जाहीर केला.आणी मंत्रालयीन स्तरावर समाजाच्या ज्या काही समस्या प्रलंबित आहेत त्या आ.हरिभाऊ राठोड यांच्या खांद्याला खांदा लावुन सोडविण्याचे प्रयत्न करीन असे सांगीतले.
         या कार्यक्रमाला मुंबई व परिसरातुन हजारो समाजबांधव उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी समितीच्या मागील वर्षाची जमखर्चाच्या पुस्तिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
      कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.साईदास राठोडसर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.निलेशभाऊ पवार यांनी केले.
Tag Banjara Teej, Gor teej