गोरमाटीर बोली भाषा बचीओ अभियान” – भिमणीपुत्र

“बोलो भाषा बचाओ अभिया”

“भाषावार प्रांत रचनेच्या चुकीच्या धोरणामुळे बोली भाषेचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे.गोर बोलीभाषिक समुह भारताच्या अनेक प्रांतात स्थिरावलेला असून ज्या ज्या प्रांतात गोरमाटी स्थिरावला त्या त्या प्रांतीय राज्य भाषेला सावत्र आई म्हणून जीवापाड प्रेम करु लागला.गोर  बोली ही गोर गणांची सखी याडी असून प्रांतीय राजभाषा ह्या मासी याडी होत.गोरमाटी सख्या याडीवर जीतका प्रेम करतो;तितकाच प्रेम तो मासी याडी (प्रांतिय राज भाषा) वर करतो.महाराष्ट्रातील गोरमाटी मराठीवर जीवापाड प्रेम करत असताना गोर गणांची सखीयाडी गोर बोली ही मण्णेरो कडापो- मरम यातना भोगत आहे ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. ती केंव्हा मरेल याचा नेम नाही. गोर बोलीभाषा नष्ट झाली तर मराठी भाषेची समृद्धी ओसरायलाही वेळ लागणार नाहीं. मराठी भाषेला राज भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी करणार्यानी बोली भाषेच्या समृद्धीचाही आग्रह धरावा. बोली भाषेचे विद्यापीठ प्रत्येक राज्यामध्ये स्थापन करून बोली भाषा वाचविण्याचा शासनानेही प्रयत्न करावा. या संदर्भात बोली भाषेचे अभ्यासक डाॅ गणेश देवी म्हणतात की,”बोलीभाषे शिवायची भाषा म्हणजे निरर्थक शब्दांचा ढिगारा ”

हे वास्तव कोणालाही नाकारता येत नाहीं. बोलीभाषा हीच प्रमाण भाषेची आई असते .म्हणुन घटनेच्या आठव्या अनूसूचित बोलीभाषेसाठी स्वतंत्र अनूच्छेद निर्माण करून बोलीभाषेस संविधानिक दर्जा द्यावा या शिवाय पर्याय नाहीं. 

-भीमणीपुत्र मोवन गुनाजी नायीक

(जूनो गोरमाटी साहित्यकार)
सौजन्यय: गोर कैलास डी राठोड

मो.9819973477