गोर तत्वांचा वेध : विरेणा

गोर बंजारा समाजामध्ये भाऊ व बहिन यांचे नाते अत्यंत पवित्र व प्रेमळ नाते, मानले जाते. बालपणापासून तारुण्यात येई पर्यंत त्यांनी एकमेकांशी जोपासलेला जिव्हाळा व घरातील कौटुंबिक संस्कार यामुळे भाऊ बहिणीच्या विचारात एक वाक्यता निर्माण झालेली असते. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे सामुहिक कार्य व सामुहिक जबाबदारी या संस्कारातून त्यांची वाढ झालेली असते. भाऊ आपल्या बहीणीला आपल्या काळजाचा तुकडा संबोधतो तर बहीन आपल्या भावाला विरेणा संबोधते. काळजाचा तुकडा संबोधण्यापाठीमागे एक भुमिका आहे. एखाद्या कुटूंबाची आपली आर्थिक, सामाजिक, राजकीय, संस्कृतिक वर्तण व विचार पद्धती असते. या पदद्धतीवरच त्या कुटूंबाचे यश-अपयश आवलंबून असते. त्या कुटूंबाची कार्यसंस्कृती, कार्य करण्याची विशिष्ट पद्धती, विशेष बीबींमध्ये दाखविलेले शौर्य व काळानुरुप घेतलेले निर्णय आणि हे सर्व करण्याची कुवत व हिंम्मत यावर त्या कुटूंबाचा इतिहास, वर्तमान व भवितव्य अवलंबून असते. बहीण लग्नानंतर दुसर्या कुटूंबात गेलेली असली तरी वैचारिक बैठक ही पित्र कुटूंबातलीच असते. वर्तण व वर्तणतत्वे ही पित्र कुटूंबाकडीच असतात.

भावाच्या बाबतीतही लग्न झाल्यानंतर आपल्या सहचरणी बरोबर वावरत असतानाही आपल्या विचाराचा पगडा कणखर ठेवण्याची पद्धत आहे. माणवी शरीररचणेमध्ये काळीजाचे कार्य हे पचनसंस्थेकडून येणार्या रक्ताचे शुद्धीकरण करणे व उर्वरीत शरीराला त्याचा पुरवठा करणे हे असते. त्याचप्रमाणे घरामध्ये येणार्या अशुद्ध विचाराचे शुद्धीकरण करण्याचे कार्य बहीणीकडे असते.

म्हणून भाऊ आपल्या बहीणीला काळजाचा तुकडा संबोधतो. भावाभावातील वाद असतील, भावाच्या घरावर आलेले एखादे संकट असेल या सर्व बाबीमध्ये भावाच्या अडचणी निवारणार्थ बहीण आपल्या पती सोबत भावाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी टाकते आणि आपल्या भावाचे, भावाच्या वित्ताचे व त्यानी जोपासलेल्या विचारसरणीचे संरक्षण करते. भावाच्या हातून काही अमानवीय व असामाजिक कृत्य घडण्याची शक्यता असेल तर मी भावाला त्यापासून प्रावर्त करते. वाईट संगतीमुळे भावाकडून जर गैरवर्तणूक होत असेल आपल्या पित्रकुटूंबाच्या प्रतिमेला तडा जात असेल तर कठोर भुमिका घेऊन भावाला सदवर्तनी बणवण्याचा प्रयत्न बहीण करत असते. या बहीणीच्या भूमीकेमध्ये बहीण ही भावाच्या काळजाचा तुकडा या संबोधनास न्याय देण्याच सतत प्रयत्न करतर राहते, यातून बंजारा समाजामध्ये अनेक भावा- बहीणीच्या जोडडय़ा आजरामर झालेल्या आहेत. विरेणा- बंजारा समाजामध्ये बहीण आपल्या भावाला विरेणा असे संबोधते. विरेणा या शब्दाचा अर्थ ज्ञान, कौशल्य, शुरत्व, विरत्व इत्यादी बाबतीत पारंगत असणे होय. बहीणीला आपला भाऊ विविध कला-कौशल्यामध्ये पारंगत असावा अशी रास्त अपेक्षा असते. माझा भाऊ हा केवळ माझ्यासाठीच विर नसून माझ्या समाजाचा, माझ्या संस्कृतीचा आणि या पृथ्वी तलाचाही तो विर आहे. या सर्वांना न्याय देण्याची पात्रता त्याच्या अंगी असावी म्हणून आपल्याकडे व आपल्या कुटूंबाकडे उपलब्ध असलेले ज्ञानकौशल्यात भावाला पारंगत करावे.

जगात येणारे नवनवीन ज्ञान व कौशल्य हेही त्याने संपादन करावे व आपला बंधू, समाजबंधू व सांस्कृतिक बंधू बनून विराच्या भुमिकेत यावा त्याच्या रक्तातले विरत्व सतत जागृत रहावे या भूमिकेतून बहीण भावाला विरेणा संबोधते. भाऊ आपल्या कृतीतून विरत्व प्राप्त करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. बहीणीवर आलेल्या संकटाचे निवारण असो किंवा त्याच्या भल्यासाठी अपेक्षीत असणारी मदत असो. ती देण्यासाठी भाऊ सतत तत्पर असतो. सामाजिक कार्य, संस्कृती संवर्धन, सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठा राखण्यासाठी आपल्या विचाराला व वर्तणाला शुद्ध ठेवत असतो. आपल्या सर्व कृतीतून विरेणा या उपाधीला स्वतः पात्र ठेवण्यासाठी तो सतत प्रयत्न करत असतो. घर घर विरेणा पेरोयये लाल कोथळी उजळीय सालो साल गोरुरी टेकडान टेकडा मंडीय पाल मोरीय केसूला पडीयये चाल.

Prof. Pandit Chavan banjara

प्रा. डॉ. पंडीत चव्हाण
राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष,
नॅशनल बंजारा प्रोफेसर्स असो. भारत.
मो. 09423138688ए 8007897947