मा. ना. श्री. संजय राठोड, राज्यमंत्री (महसूल)
गोर (बंजारा) समाजाचे शिष्टमंडळ मा. ना. श्री. संजय राठोड, राज्यमंत्री (महसूल) यांच्या नेतृत्वाखाली मा. मुख्यमंत्री महोदयांना भेटले. या शिष्टमंडळाने गेल्या चार वर्षातील प्रमुख मागण्यांबाबत सादरीकरण केले. या सादरीकरण दरम्यान गेल्या चार वर्षामध्ये शासनाने त्यांच्या मागण्यांबाबत कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे तिव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर मा. मुख्यमंत्री महोदयांना बैठकीच्या सुरुवातीला पोहरागड येथे संत सेवालाल महाराज मंजूर विकास आराखडा, सेवालाल महाराजांची जयंती साजरी करणेबाबत शासन निर्णय व गोर बोली भाषेला केंद्र शासनाच्या 8 व्या सूचीमध्ये समावेश करण्याबाबत प्रस्ताव केंद्रास पाठविला त्याबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले. सत्कार झाल्यानंतर बंजारा समाजाचे चार वर्षात पाठपुरावा घेत असलेल्या प्रमुख 20 मागण्यांबाबत मुद्येनिहाय शिष्टमंडळाने सादरीकरण केले. या मागण्यांपैकी गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याबाबत केंद्र शासनाकडे शिफारस करणे, नॉन क्रिमिलेअरच्या अटीतून गोर बंजारा समाजाला वगळणे व पदोन्नतीमध्ये आरक्षण देणे याबाबत मा. श्री. अमरसिंग तिलावत, माजी मंत्री, आंध्र प्रदेश व प्रा. मोहन चव्हाण यांनी सादरीकरण केले.
गोर बंजारा जमातीला ते कसत असलेल्या व तांडे राहत असलेल्या जमिनी त्यांच्या नावावर करणे, भूमिहिन शेतमजूरांना सबळीकरण योजनेच्या माध्यमातून जमिन देणे व वनहक्क अधिनियम अंतर्गत वनपट्टे मंजूर करण्यासाठी शासन परिपत्रक निर्गमित करणेबाबत सादरीकरण श्री. रविंद्र प्रवार, उपजिल्हाधिकारी यांनी केले. तदनंतर विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत डॉ. टी. सी. राठोड यवतमाळ यांनी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांना वसतीगृह सुविधा देणे, वसतीगृहामध्ये 20 टक्के आरक्षण देणे, वंचित विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देणे. सारथी व बार्टीच्या येाजनेच्या धरतीवर योजना सुरु करण्याबाबत विनंती केली.
गोर बंजारा राहत असलेल्या तांडयाचा विकास करण्याच्या दृष्टीने यापूर्वीचा शासन निर्णयानूसार 300 लोकसंख्या असलेल्या तांडयामध्ये ग्रामपंचायती स्थापन करणे, गोर बंजारा लोक कलांचा राज्याच्या सांस्कृतिक धोरणात समावेश करुन गोर कलावंत येाजना सुरु करणे व गोर बंजारा जमातीच्या कलासाहित्य व संस्कृती जतन संवर्धन करण्याच्या दृष्टीने गोर बंजारा अकादमी स्थापन करणेयाबाबत श्री. निलेश राठोड, विशेष कार्य अधिकारी यांनी सादरीकरण केले.
गोर बंजारा जमातीतील कलाकुसर जिवंत ठेवणे व तिला बाजारपेठ मिळवण्याच्या दृष्टीने वृध्द महिलांकडून केले जाणारे भरतकाम, विणकाम आदींसाठी क्लस्टर डेव्हलपमेंट येाजना सुरु करण्याबाबत सहसचिव श्री. बळीराम चव्हाण यांनी सादरीकरण केले. परदेशी शिक्षण व त्यासाठी शिष्यवृत्ती तसेच युवक व युवतींचे कौशल्य विकास करण्याच्या दृष्टीने औद्योगिक प्रशिक्षण केद्राची पोहरागड येथे स्थापना करण्याबाबत श्री. राजाराम जाधव, सहसचिव यांनी मागणी केली.
वसंतराव नाईक महामंडळ सक्षम करणे, पूर्वीची तांडा सूधार येाजना लागू करणे व आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ करणे याबाबत श्री. किरण वडते, उपसचिव व श्री. बापूराव राठोड, लातूर यांनी सादरीकरण केले. विमुक्त जाती “अ” या प्रवर्गात नामसाधर्म्याचा व जातीचे बोगस वैधता प्रमाणपत्र मिळवून मूळ विमुक्तांवर अन्याय होत असल्याबाबत भामटा राजपूतचे प्रतिनिधी अनिल साळूंखे यांनी विषयाचे सादरीकरण केले. मुंबई येथे समाजभवनासाठी जागा मिळावी यासाठी राजू नाईक, AIBSS यांनी मागणी केली. चर्चेच्या दरम्यान श्री. हरिभाऊ राठोड, विधानपरिषद सदस्य, यांनी संथगतीने चाललेल्या कारभाराबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली. व अधिकारी नकारात्मक भूमिका घेतात याबाबत तक्रार मांडली. तदनंतर मा. आ. श्री. तुषार राठोड, नांदेड, मा. आ. श्री. निलय नाईक, पुसद यांनी सदर बैठकीसाठी मा. मुख्यमंत्री महोदयांनी वेळ दिला याबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले व बैठक समाप्त करण्यात आली. या बैठकीस –
मा.श्री.हरीभाऊ राठोड, विधानपरिषद सदस्य मा.डॉ.तुषार राठोड, विधानसभा सदस्य, मा.ॲड निलय नाईक, विधानपरिषद सदस्य, मा. श्री. अमरसिंग तिलावत, माजी मंत्री, आंध्र प्रदेश, मा.श्री.राजू नाईक, AIBSS मा.श्री.शंकर पवार, ऑल इंडिया बंजारा सेवासंघ, श्री. बी. के. नाईक, महासचिव, AIBSS, श्री. गोविंद राठोड, न्यायाधिश, श्री. एस. टी. नाईक, सेवानिवृत्त न्यायाधिश, श्री. मिलिंद पवार, आर्किटेक्ट, श्री. मंगल चव्हाण, विकासक, श्री. मोहन चव्हाण, नागपूर, श्री. टी. सी. राठोड, NSDA श्री. योगेश चव्हाण, उद्योजक, श्री. सचिन जाधव, सामाजिक कार्यकर्ते, डॉ. महेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते, श्री. सुभाष जाधव , गटविकास अधिकारी, श्री. ज्योतिराम चव्हाण, सेवानिवृत्त सहसचिव, श्री. बळीराम चव्हाण, सहसचिव, श्री. राजाराम जाधव, सेवानिवृत्त, सहसचिव श्री. किरण वडते, उपसचिव, मंत्रालय, श्री. बापूराव राठोड, लातूर आदि समाज बांधवाचे प्रतिनिधी म्हणून मान्यवर उपस्थित होते.निलेश राठोड,विशेष कार्य अधिकारी