गोर बंजारा प्रतिष्ठान बदलापूर आयोजित तीजोत्सव आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा झाला. 

मुंबई प्रतिनिधि ​२१/०८/२०१६ रोजी गोर बंजारा प्रतिष्ठान बदलापूर आयोजित तीजोत्सव आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार अत्यंत उत्स्फूर्तपणे पार पडला. यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्श अमरसिंगभाउ राठोड, उपाध्यक्श बाबुसिंग राठोड, सचिव छोटू जाधव व सहसचिव अनिल चव्हाण सर्व कार्यकारी मंडळ व सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                      प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मारूती राठोड, भाजपा शहराध्यक्श व नगरसेवक संभाजी शिंदे , मुंबईमे वाहतूक संघटना अध्यक्श सौ.ज्योती चव्हाण, अधि. अभियंता विकास राठोड डॉ. प्रकाश राठोड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

    अध्यक्शीय भाषणातून अमरसिंगभाउ राठोड व सचिव छोटू 

जाधव यांनी तीज परंपरेचे महत्व सांगितले. 

   तसेच प्रतिष्ठान हे समाजातील गरिब, हुशार, अनाथ, होतकरू मुलांसाठी काम करणार असल्याचे सांगितले. तसेच प्रतिष्ठान च्या माध्यमातून मुलामुलींसाठी ग्रंथालय, संगणक कार्यशाळा, अनाथालय महिलांसाठी लघुद्योग उभारणयाचा मानस असल्याचे सांगितले.

मारुतीकाका राठोड यांनी या संकल्पनेस पाठिंबा दर्शविला.

भाजपा शहराध्यक्श संभाजी शिंदे यांनी या संकल्पनेस पाठिंबा दर्शवित बदलापूर मध्ये एका चौकास संत सेवालाल महाराज चौक असे नामकरण करणार असल्याचे जाहीर करत मा.वसंतराव नाईक साहेबांचे स्मारक उभारण्याचे जाहीर केले.

प्रतिष्ठान च्या शैक्शणिक कार्यासाठी जागा मिळविण्यासाठी ५०००० रू देण्याचे जाहीर केले.

याबरोबरच या कार्यक्रमात गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला.

सदर कार्यक्रमास बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  ????. आयोजक. ????

अध्यक्श: अमरसिंगभाउ राठोड 

उपाध्यक्श: बाबुसिंग राठोड

सचिव : छोटू जाधव 

सर्व कार्यकारीणी व सभासद वर्ग


प्रतिनिधि – गजानन डी. राठोड

चिफ एडीटर – बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल

वेबसाइट – www.banjaraone.com

भ्रमणध्वनी – 9619401377