*जय सेवालाल जय वसंत*
????????????????????????????
*”आब गोरबोलीम इंग्लिश बोलेरो सिका”या पुस्तकांची प्रचंड विक्री*
*लेखक व संपादन*
प्रा.संतोष एच.राठोड मुंबई
प्रा.दिनेश एस.राठोड
*मुंबई, कल्याण* दि. 18– बंजारा फाऊंडेशन मुंबई द्वारा प्रकाशित व वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ द्वारा आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळास बंजारा समाजातील मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात पार पडला.
कार्यक्रमास गोर वाचकांचा विशेष करून युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. माझ्याकडे पुस्तक विक्रीची जबाबदारी सोपविण्यात आली.प्रकाशनाच्या दिवसीच 250 रुपये किंमतीचे हे पुस्तक सवलतीत 200 रुपयात विकण्यात आले.प्रकाशन दिनी सुमारे 400 पुस्तकांची प्रचंड विक्रीची नोंद झाली. या पुस्तकांची वाचकांतर्फे प्रचंड मागणी होती आहे .प्रकाशना आधी बुक झालेली प्रतीही गोरबांनवांना सुपूर्त करण्यात आल्या आहे. गोरबोलीतुन कठीन इंग्रजी भाषा शिकण्या सोपा मार्ग लेखक प्रा.संतोष राठोड व संपादन प्रा.दिनेश राठोड यांनी या पुस्तकात दर्शविलेला आहे.आज इंग्रजी विषयाची प्रत्येक क्षेत्रातील व्यापकता वाढलेली आहे.
इंग्रजी भाषा आपली मातृभाषा अथवा बोलीभाषा नाही. आपली बोलीभाषा गोरबोली आहे.त्यामुळे इंग्रजी भाषा ही आत्मसात करण्यासाठी अत्यावश्यक इंग्रजी सूत्रे गोरबोलीतून सोप्या पध्दतीने मांडणी केलेली असल्याने हे पुस्तक सर्व वयोगटातील गोर बंजारा साठी बहुमोल असेच आहे.
पुस्तकांना वाचकांनी अधिक पसंती दिली आहे. प्रकाशन सोहळामध्ये बहुसंख्य गोरबांधवांचा सहभागाने आमचा आनंद द्विगुणित झाला. परिवर्तन चळवळीचे हे शैक्षणिक कार्य बंजारा समाजाच्या समाजिक व शैक्षणिक प्रगतीस भविष्यात उपकारक ठरेल. हे पुस्तक आपण जरूर वाचा.व इंग्रजी भाषासोबतच गोरबोलीचे जतन करू या..vpp ने सुध्दा पुस्तक पाठविले जाईल.
*संपर्क*
प्रा.दिनेश एस.राठोड
मोबाईल..9404372756
✍ आपला,
*पंडित अ.राठोड*
वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ , मुंबई
सौजन्य गोर कैलास डी राठोड
Tag: Banjara Gorboli English Speaking Books publish by Santosh Rathod