“गोर बोली भाषेचे अस्तित्व न टिकल्यास सास्कंतीक ऐक्य धोक्यात येईल”:-भाग 2

jagrut-gor-banjara-banjaraone.com

jagrut-gor-banjara-banjaraone.com

*गोर बोली भाषेचे अस्तित्व न टिकल्यास*

*बंजारा समाजाचे सांस्कृतिक ऐक्य धोक्यात येईल*  जरूर वाचा ????????

( गोर बोली भाषा जागृती अभियान )

*भाग..२*

जेव्हा १९६१मध्ये जनगणना झाली त्या वेळी १६५२ मातृभाषांची यादी झाली. प्रत्येक भाषा ही मातृभाषा नसते. पण तरीही साधारण ११०० भाषा असाव्यात, असं त्यावेळचं अनुमान होतं. १९७१मध्ये फक्त १०८ भाषा दिसल्या. म्हणजे दहा वर्षांत भारत सरकारने १५०० भाषा यादीतून काढून टाकल्या. त्यानिमित्ताने जर ऐतिहासिक सांख्यिकीचा अभ्यास केला तर इंग्रज  लिअर्सनचे सव्‍‌र्हे बघितले तर त्याच्यातही १८९ भाषा आणि ५४४ बोलीभाषा अशा जवळपास ७०० भाषा असल्याचे दिसले होते. एवढय़ा भाषा असताना १९७१मध्ये फक्त १०८ नावेच कशी, हा प्रश्न तयार होतो तर जास्तीत जास्त भटक्या विमुक्तांच्या आणि आदिवासींच्या भाषा काढून टाकल्याचे लक्षात येते त्यात आपली बंजारा गोर बोलीचा  सुध्दा समावेश समजल्या जाते..म्हणून  याबाबत मात्र  साहित्य अकादमीनी अधिक अभ्यास संशोधनात्मक विषय म्हणून करने महत्त्वाचे वाटते.  पण आज गोरमाटी बोलीसह अनेक बोलीभाषा आहेत. त्यांची स्वताची लिपी नाही. त्यामुळे त्याचे बोली भाषेतील साहित्य तयार झालेल  नाही.झाले असल तरी ते मात्र नगन्यच..भाषेच्या उत्क्रांतीचा प्रवास लक्षात घेतला तर भाषेचा विकास साधारणपणे सत्तर हजार वर्षांपूर्वीपासून सुरू झाला. सुरुवातीच्या ४० हजार वर्षांमध्ये माणूस फक्त वर्तमानकाळ बोलत असे. म्हणजे वास्तवाचं चित्रण करणारेच शब्द आणि वाक्य होती. साधारणपणे ३० हजार वर्षांपूर्वी भूतकालवाचक वाक्यांचा विकास होण्यास सुरुवात झाली. म्हणजे, समोर नसलेल्या गोष्टींबद्दल शब्दांद्वारे बोलायला सुरुवात झाली. सुरुवातीची ४० हजार वर्षे केवळ मौखिक भाषेत केवळ सत्य आणि सत्याचाच वापर होत होता. पण नंतर भाषेत ‘असत्य’देखील येऊ लागले. लहान मुलांनाही साधारणपणे अडीच ते साडेतीन या वयात असत्य बोलणं अवघड जातं. कारण असत्य बोलणं खूप मोठी कला आहे. वर्तमानपत्रांची भाषा ही तर मानवी भाषेतील खूप मोठी प्रगती आहे. सध्या सायबर स्पेसमध्ये भविष्यकाळ, वर्तमानकाळ आणि भूतकाळ यांची उलटापालट करण्याची शक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे याच्यापुढच्या भाषा या वेगळ्या प्रकारची काळाची रूपं घेऊन आलेल्या भाषा असतील. गोरमाटी बोलीच्या बाबतीत सुध्दा असच घडतय

लहानपणी मुलांना भाषेचे संस्कार करण्यात सुध्दा आमची सुशिक्षित मंडळी कमी पडतय, घरात मराठी भाषेचा वापर जास्त केला जातो त्यामुळे येत्या गोरमाटी बोलीचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते..
*प्रा.दिनेश एस. राठोड*

ऑल इंडिया बंजारा सेवा संघ

व वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ, मुंबई

*क्रमशः*…..
सौजन्य: गोर कैलास डी राठोड

Tag: Banjara language, Banjara boli bhasha, banjara vate, lamani. lambadi, bazigar, hisotry books